shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय हनुमान बहुउद्देशीय संस्था व दलित युवक आंदोलन यांच्या वतीने रूईत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती व माजी आमदार गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जय हनुमान बहुउद्देशीय संस्था व दलित युवक आंदोलन यांच्या वतीने रूईत  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती व माजी आमदार गणपतराव देशमुख  यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
इंदापूर प्रतिनिधी:१ ऑगस्ट २०२१  सकाळी ९ वा 
युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्न नेहरू युवा केंद्र पुणे संगठण जय हनुमान बहुउद्देशीय संस्था व दलित युवक आंदोलन यांच्या वतीने रूई ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती व विश्वविक्रमी आमदार भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,   यावेळी  101 आंबा, जांभूळ, चिंच ,अशा प्रकारच्या झाडांचे ग्रामस्थांना, मान्यवरांना वाटप करण्यात आले,*
 महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ आमदार जागतिक विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहे ते राज्याचे  माजी विधानसभा अध्यक्ष,कै.गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या प्रतिमेला रूई गावांमध्ये पुष्पहार अर्पण करून  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, 

यावेळी रूई ग्रामपंचायत सरपंच यशवंतराव कचरे, पोलीस पाटील अजितसिंह पाटील, रूई सोसायटी चे सचिव महादेवराव माने, अंकुश लावंड, संजय भगत गांधी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांबळे, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक विकास कणसे, शिवाजी मोहिते, दलित युवक आंदोलन तालुका अध्यक्ष  व जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस  अविनाश मोहिते, उपाध्यक्ष संदीप भिंगारदिवे, भारतीय बेरोजगार  मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, अमोल कांबळे, दत्तात्रय मारकड, अमोल भुजबळ,आदी मान्यंवर उपस्थित होते, यावेळी रूई ग्रामस्थही मोठ़या प्रमाणात उपस्थित होते, अशी माहिती जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव मारकड यांनी दिली.
close