प्रतिनिधी : संजय वायकर
अ.नगर : (दि .२) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदारांचे कोरोना प्रतिबंधक नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असतानाही शनिवार व रविवार रोजी अहमदनगर शहराबाहेरील औरंगाबाद रोडवरील हॉटेल्स परमिट रूम राजरोसपणे चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे .
covid-19 चे रुग्ण वाढत आहेत आणि शासकीय निर्देशानुसार शनिवार रविवार सर्व आस्थापना बंद राहणे आवश्यक आहे. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि सदर आस्थापना एक महिन्यासाठी पूर्ण बंद करण्याची कारवाई केली जाईल असे तहसिलदारांचे आदेश आहेत .
प्रामुख्याने नगर -औरंगाबाद रोडवरील काही हॉटेल्स मध्ये व परमिट रूममध्ये तळीरामांची गर्दी पहावयास मिळते . कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसते .
तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत येथील व्यवसाय कोणाच्या वरदहस्ताने कोरोना नियमांच्या विरोधात चालू आहेत असा नागरिकांना प्रश्न पडला असून यामुळे कोरोना वाढत असल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत .

