प्रतिनिधी : आसावरी वायकर
अ .नगर : (दि .१३) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे अंतर्गत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( PSS Exam ) १२ ऑगस्ट रोजी नगर येथील आठरे पाटील शाळा आणि डॉन बॉस्को शाळा येथे घेण्यात आली. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसुन आला . शिष्यवृत्ती परिक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इ .५ वी आणि इ .८ वी ची २०२० या वर्षी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परिक्षा रद्द करण्यात आली होती . तीच परिक्षा उशिराने का होईना १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
२०२० मध्ये सदर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यासाठी शासनाने निश्चित केले होते परंतु शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांनी कोरोनाच्या संसर्गामुळे यास कडाडून विरोध केला होता .
परिणामी शासना मार्फत या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड - १९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून या परीक्षा घेण्यात आल्या .

