shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूरग्रस्तांसाठी मदत केल्याबद्दल चिपळुणचे आमदार शेखर निकम यांनी स्वतः पत्र पाठवून कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे मानले आभार..!


पूरग्रस्तांसाठी मदत केल्याबद्दल चिपळुणचे आमदार शेखर निकम यांनी स्वतः पत्र पाठवून  कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे मानले आभार..!
 
इंदापूर प्रतिनिधी:राज्यमंत्री नामदार  दत्तात्रय  भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी तत्परतेने केलेल्या मदतीबद्दल चिपळुणचे आमदार शेखर निकम यांनी स्वतः पत्र पाठवून  कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे आभार मानून पुढील सामाजिक कार्यास समस्त कोकणवासियांकडून  शुभेच्छा व्यक्त केली असल्याची माहिती अनिकेत भरणे यांनी दिली.
               पश्चिममहाराष्ट्र,कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्यांना एक हात हक्काचा देण्यासाठी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  दत्तात्रय  भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत इंदापूर तालुक्यातील जनता व विविध संस्थांच्या माध्यमातून मिळालेली अनमोल मदत  अनिकेत भरणे,श्रीराज भरणे यांनी तत्परतेने आपल्या सहकाऱ्यांसमवेत चिपळूण येथे जाऊन चिपळुणचे आमदार शेखर निकम  यांच्यामार्फत तेथील जनतेला मदत पोच केली.त्याचबरोबर सदर पूरग्रस्त भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या अडी अडचणी समजून घेताना त्यांना कौंटुबिक सदस्यांप्रमाणे आधार देण्याचे काम केले.
              संकटाच्या काळात तातडीने केलेल्या मदतीबद्दल चिपळुणचे आमदार  शेखर निकम  यांनी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  दत्तात्रय  भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी झालेल्या अनमोल मदतीबद्दल प्रतिष्ठानचे विश्वस्त  अनिकेत भरणे यांच्या नावे पत्र पाठवताना आमदार  शेखर निकम  आपल्या भावना व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त करून समस्त कोकणवासियांच्या वतीने कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
                चिपळुनचे आमदार  शेखर निकम  यांनी पाठवलेल्या कृतज्ञता पत्रामुळे यापुढील काळात सामाजिक कार्य करताना कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व प्रतिष्ठानच्या सर्व सहकारी मित्रांना निश्चित उर्जा मिळणार असल्याचे  अनिकेत भरणे यांनी सांगितले.
close