shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे - भरतशेठ शहा.

युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे - भरतशेठ शहा.
एस. एस. ट्रेडर्स या दुकानाचे उद्घाटन समारंभ संपन्न

इंदापूर:- सद्यस्थितीत देशात कोरोना मुळे, मंदिची लाट असून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आजच्या पिढीने उद्योगाकडे वळण्याची गरज आहे,सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण झालेले असुन युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन इंदापूर अर्बन बँकेचे मा.चेअरमन भरतशेठ शहा यांनी एस.एस.ट्रेडर्स पानमटेरीयल होलसेल दुकानाच्या उदघाटन प्रसंगी भरतशेठ शहा यांनी (११ ऑगस्ट) रोजी केले, या वेळी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अॅड राहूल मखरे, कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र दादा रेडके, तेजप्रुथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक नानासाहेब खरात दुकानमालक वसीम शेख, आझाद पटेल,सुरज धाईंजे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गावोगावी वाढत्या पान टपरी व त्यावर लागणाऱ्या पान मटेरियल साहित्य हे या व्यवसायिकांना उपयुक्त दरामध्ये मिळावे या उद्देशाने सोहेल शेख, जुनेद शेख वसीम शेख  परिवारातील या तरुणांनी पान व पानाचे मटेरियल सर्व नामांकित कंपन्यांच्या गोळ्या बिस्किटे चॉकलेट चे होलसेल होलसेल आणि रिटेल विक्री करणाऱ्या दुकानाची निर्मिती करून त्याचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करुन आपल्या जीवनाचा यशस्वी पाया घडवण्याचा त्यांनी आज पासून सुरुवात केली.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे वसीम शेख यांनी आभार मानले.
close