shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा पातरखेडा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा...!!

प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
९९६०५९५८०७

एरंडोल  - तालूक्यातील अनुदानित आश्रमशाळा पातरखेडा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी समाजाचे जननायक ख्वाजा नाईक आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी  आश्रमशाळेचे सचिव विजय शिवाजी पाटील होते. कार्यक्रमास सैनिक कांतीलालभाऊ, मुख्याध्यापक, शिक्षक़-शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह परिसरातील नागरीक आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती लसीकरण, परिसर स्वच्छता याबद्दल माहिती देण्यात आली.
close