नव युगात तरुणांनी सजग राहणे आवश्यक - प्रदिप गारटकर
फोटो : इंदापूर येथे रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या पदग्रहण समारंभात मार्गदर्शन करताना प्रदिप गारटकर व मान्यवर
रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचा पदग्रहन समारंभ संपन्न : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी देणार
इंदापूर : आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जर तरुणांना आपले व्यक्तीमत्व विकास घडवून घ्यायचा असेल तर, या नव्या युगात तरुणांनी सजग राहणे गरजेचे आहे असे मत इंदापूर रोटरी क्लबचे संस्थपाक अध्यक्ष रो. प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर तर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ इंन्द्रेश्वरच्या २०२१ - २२ या वर्षीच्या अध्यक्ष, सचिव व बोर्ड ऑफ डायरेक्टच्या पदग्रहण समारंभ मंगळवार ( दि. १० ) रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या २०२१-२२ या वर्षीच्या अध्यक्षपदी सागर शिंदे व सचिवपदी विश्वास गाढवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी प्रदीप गारटकर बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआरआर पार्थ जावोकर, प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदिप गारटकर, संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, हॅप्पी व्हिलेज डिस्ट्रिक्ट मेंटोर वसंतराव माळुंजकर, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष उदय शहा, सचिव भीमाशंकर जाधव, युथ डायरेक्टर राकेश गानबोटे, ज्ञानदेव डोंबाळे, संजय दोशी, धरमचंद लोढा, तुषार रंजनकर, नरेंद्र गांधी, नितीन लोंढे रोट्रॅक्ट क्लबचे एझेडआर तनिष्का जाधव, डीझेडआर संकेत जैन, झोन सातचे डीझेडआर अर्जुन फिरके व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन बॉर्ड ऑफ डायरेक्टर यांना रोट्रॅक्ट क्लबची पिन प्रधान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी पार्थ जावोकर, प्रदिप गारटकर, मुकुंद शह, वसंतराव माळुंजकर, नूतन अध्यक्ष सागर शिंदे यांनी भाषणे केली.
तर रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या अध्यक्षपदी सागर शिंदे, सचिवपदी विश्वास गाढवे, उपाध्यक्षपदी रामदास पवार, सार्जंट ऑफ आर्म पदी मच्छींन्द्र किरकत, खजिनदारपदी सागर आवटे, क्लब सर्व्हिस डायरेक्ट ज्ञानेश्वर वलेकर, कम्युनिकेशन डायरेक्टर आकाश खरात, वूमन डेव्हलपमेंट डायरेक्ट शबनम शेख, प्रोफेशन डेव्हलपमेंट ऑफिसर अमोल राऊत, क्लब एडिटर दीपक जगताप, डायरेक्ट पदी मोहिनी शिंदे - भोसले, राजेंद्र गारदी, सचिन चौगुले, अमोल आवटे, अस्मिता किरकत, पुजा पवार, अनिकेत शिंदे या युवक युवतींची निवड करण्यात आली.
___________________________________________________
चौकट : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी देणार
रोटरी व रोट्रॅक्ट क्लब 'लोकल टू ग्लोबल' सामजिक करत आहे. रोट्रॅक्ट क्लबमध्ये तरुणांना संधी देवून, त्यांचा संपूर्ण व्यक्तीमत्व विकास घडविण्यावर आमचा भर आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचाही सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकास यामाध्यमातून घडणार आहे. आम्ही विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी यंदा सक्रिय काम करीत असून, तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार आहे अशी ग्वाही रोट्रॅक्टचे जिल्हा प्रमुख पार्थ जावोकर यांनी व्यक्त केले.

