shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण ( ६५ ) उंडल / पुन्नाम...!!

पर्यावरण जनजागरणाचाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता कर्क राशीत आश्लेषा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष उंडल/ पुन्नाग(calophyllum inophyllum) हा आहे. 

सरासरी नऊशे ते पंचवीसशे मिलिमीटरपर्यंत पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व 20 ते 40 सेंटिग्रेड तापमान असणाऱ्या प्रदेशात, रेताड पोयट्याची, उत्तम निचरा होणारी, समुद्रकिनार्‍याची जमीन या वृक्षासाठी उत्तम असते. मात्र हलक्या आणि मुरमाड जमिनीत हा वृक्ष येत नाही.

उंडल वृक्षाची साल काळसरलाल रंगाची असते. कठीणता मध्यमप्रकारची असते तर तर लाकूड चॉकलेटी लालसर रंगाचे असते.या वृक्षाची पाने दहा सेंटीमीटर पासून वीस सेंटीमीटर पर्यंत लांबीची व साडेसात सेंटीमीटरपासून दहा सेंटीमीटर रुंदीची, अंडाकृती चकाकणारी आणि गुळगुळीत असतात. पानांमध्ये समांतर शिरा असतात आणि या पानात तेलाचे गुणधर्म असल्यामुळे यावरून पाणी वाहून जाते.

उंडलाची फळे गोल काळपट चॉकलेटी रंगाची कठीण कवचाची असतात. याचा वापर तेलबिया म्हणून करतात. मे /जून महिन्यामध्ये ही फळे पिकतात.
ही झाडे दिसायला सुंदर आणि मध्यम आकाराची असतात. याला इंग्रजीत अलेक्झांड्रिया लॉरेल असेही म्हणतात. उंडलच्या फुलांच्या पूंकेसरांना काळे नागकेसर असेही म्हणतात. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी या झाडांचा वापर होतो. उंडलाची पाने पाण्यात भिजवून ते पाणी डोळे धुण्यासाठी वापरतात. वाळलेल्या पानांची तपकीर करून ओढल्यास अर्धशिशी बरी होते. 

पोट साफ होण्यासाठी सालीचा काढा उपयुक्त असतो. तेलाचा वापर  गिन्होरीया रोगावर तसेच त्वचारोगावर तेलाचा वापर करतात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close