देहरे । प्रतिनिधी : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर तालुक्यातील देहरे येथे कोरोना योद्धयांचे सन्मान सोहळा संपन्न झाला.
जागतिक महामारी असताना अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा व्हावा या उदात्त इच्छेने स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट २०२१ रोजी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,नर्स,औषधालय,लॅब,अँबुलन्स चालक, सफाई कर्मचारी तसेच महसूल,महावितरण,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी,पाणीपुरवठा,स्वच्छता याच बरोबर स्वयंसेवी युवक व १०वी,१२वी चे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सदैव सामाजिक कार्य क्षेत्रात झोकून घेतलेल्या "संभाजीराजे ग्रुप " यांचे मार्फत करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कोरोनात तीव्रतेने खरी गरज असलेल्या व नैसर्गिकरीत्या ऑक्शीजन निर्मिती करण्यासाठी वृक्षारोपण करुन, तर सांगता आज नितांत गरज भासत असलेल्या रक्तदान शिबीराने झाली...!
यावेळी पं.स.सदस्य व्ही डी काळे,सरपंच हिराबाई करंडे, उपसरपंच दिपक जाधव, चेअरमन दिलीप करंडे, उद्योग पती दिपकजी दरे, डॉ.पोहरे मॅडम, जयश्री किरण लांडगे, सौ शितल चोर, शंकर कटारे, डॉ. मंदार भोसले,मेजर संतोष काळे, बालवे मेजर,पो.पाटील चंद्रकांत खजिनदार, अजित काळे, साजित शेख, राम पिंपळे, कैलास डावरे, लक्ष्मण ढसाळ, जेष्ठ पत्रकार रमेश जेठे, हरिदास करंडे, ज्ञानेश्वर लांडगे, यशवंत काळे, मेघनाथ धनवटे, सुभाष वाघ, प्रविण करंडे, राजेंद्र लांडगे,भानुदास भगत, बबनराव कऱंडे, किसनराव धनवटे, नितीन भांबळ,अमोल काळे व देहरे पंचक्रोशीतील नागरिक कोरोनाचे नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी समाजासाठी निस्वार्थ पणे कार्य अखंड चालू राहील असे संभाजीराजे ग्रुपचे अध्यक्ष स्वप्निल लांडगे म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा.सुहास पाखरे यांनी केले तर महेश काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले...!

