shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द असावी लागते'- प्रा. सुहास पाखरे सर


देहरे । प्रतिनिधी
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर तालुक्यातील देहरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डी वाय पाटील एमबीए कॉलेजचे प्रा सुहास पाखरे सर कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले की, जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द असावी लागते.निस्वार्थपणे कष्ट करण्याची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळते'.

या कार्यक्रमप्रसंगी देहरे येथील चर्चित असलेले संभाजी राजे ग्रुप व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना योद्धांचा सत्कार  व दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
 
या कार्यक्रमासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे मा. दीपक दरे , पंचायत समिती सदस्य व्हिडी काळे, सरपंच हिराबाई करंडे सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप करंडे, माजी चेअरमन हरिदास करंडे, चेअरमन कैलास डावरे, मा चेअरमन यशवंत काळे, मा चेअरमन ज्ञानेश्वर लांडगे, बबनराव करंडे,जेष्ठ पत्रकार रमेश जेठे, डॉ मंदार भोसले, डॉ निंबाळकर, डॉ खाडे, डॉ, कोळेकर उपसरपंच दीपक जाधव, ग्रापं सदस्य जयश्री लांडगे, ग्रापं सदस्य अनिता काळे, ग्रापं सदस्य  शितल चोर,ग्रापं सदस्य रोहिणी करंडे, ग्रापं सदस्य अजित सर्जेराव काळे, ग्रापं सदस्य साजिद शेख, मेजर संतोष काळे अमोल काळे, निखिल शेळके, मेघनाथ धनवटे,मा.सरपंच किसनराव धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवात वृक्षारोपण व शेवट अष्टविनायक ब्लड बँकेच्या ब्लड डोनेशन ने संपन्न झाला.

या कार्यक्रमप्रसंगी संभाजीराजे ग्रुपच्या वतीने कोरोना योध्यांचे सन्मान करण्यात आले.यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक कामातून समाज प्रबोधनाचे निस्वार्थपणे कार्य करण्याचे आश्वासन संभाजी राजे ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील लांडगे यांनी दिले.

यावेळी माननीय शंकर कटारे सर यांनी मार्मिक भाषण केले, या कार्यक्रमासाठी देहरे पंचक्रोशीतील ग्रापं सदस्य, सेवा सोसायटीचे सदस्य मंडळ, तरुण मंडळ, आदी उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सरकारी  हॉस्पिटल स्टाफ, आदि कोरोना योद्यांचा‌ यांचा सन्मान करण्यात आला, 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा अमोल काळे, सुहास गोपाळे, सुभाष वाघ, प्रवीण करंडे, साहील शेख, आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे युवानेते मा महेश काळे पाटील यांनी आभार मानले.
close