shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

पडस्थळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

इंदापूर प्रतिनिधी: (१५ ऑगस्ट २०२१)
भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस पडस्थळ ता. इंदापूर येथे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी  उपस्थितांना महेंद्र रेडके यांनी त्यांच्या वतीने भारत मातेची प्रतिमा   भेट देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. 
 विद्यार्थ्यांची भाषणे, गाणी तसेच कवायत घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.तसेच शाळेमध्ये शिक्षकांनी घेतलेल्या हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल यावेळी जाहीर  करून हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन आप्पाराव मारकड यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण मारकड होते. यावेळी या कार्यक्रमास विद्यार्थी व ग्रामस्थ  मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते. 

शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव व सहशिक्षक सुरेश घोळवे यांनी कार्यक्रमाचे छान नियोजन कोरोना काळा मधील सर्व नियमांचे पालन करून केले होते.

 उपस्थित गावकऱ्यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
close