प्रतिनिधी : सिराज शेख
ऊंदरखेल : (दि.१६) : आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथे आ.बाळासाहेब आजबे यांच्या निधी अंतर्गत ऊंदरखेल ग्रामपंचायतला आठ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे .
या निधीतून उंदरखेल ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे सभामंडप बांधकामाचे काम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच हरिभाऊ दहातोंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राजाभाऊ दहातोंडे,सरपंच अंकुश वामन, ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ दहातोंडे, माजी सरपंच संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ दहातोंडे तसेच शरद वामन, गहिनीनाथ वामन, नारायण दहातोंडे, पिंपळे, कर्डिले ,वाघमारे, थोरात, कारभारी वामन आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

