shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याची सोनगीरला कार्यशाळा संपन्न..!

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

सोनगीर येथे शाडू मातीचे गणपती बनवण्याची दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. शाडू मातीपासून गणपती बनावण्याच्या कार्यशाळेत सोनिक ऑक्टव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्याचा समावेश होता. कार्यशाळेत २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सोनगीर येथे गेल्या वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातच मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तरी या वर्षी तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने या वर्षी देखील गणेशोत्सव हा शासनाच्या गाइडलाइननुसार व पर्यावरणपूरक आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. या कार्यशाळा घेण्यामागील हाच उद्देश आहे. 




कार्यशाळेत गणपती मूर्ती बनवण्यासाठी शिकवत असताना निखिलसिंग परदेशी यांनी शाडूमातीच्या मूर्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कोरोनाची सद्य:स्थिती ही सामान्य झाली तरी आपण तिस लाटेची गंभीरता घेत या वर्षी गणेश उत्सव पर्यावरणपूरक गणेशमूर्तीमुळे गणेश विसर्जन घरातच करू शकतो. 


यामुळे आपल्या परिवाराचा कोरोना सारख्या जीवघेण्या आजारापासून आपण आपले रक्षण करू शकतो आणि पीओपीच्या मूर्तीने पाणी दूषित होते. गणपती मूर्तीदेखील पाण्यात विरघळत नसल्याने देवाच्या मूर्तीची देखील विटंबना होते. तरी सर्व ग्रामस्थांनी पाणी दूषित होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे आणि पर्यावरणपूरक गणेश देवतांची मूर्तीचा वापर करून पर्यावरण दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी सहकार्य करावे असे सांगितले. कार्यशाळेचे आयोजन सोनिया परदेशी (वर्मा) यांनी केले. त्या प्रसंगी उपस्थित तन्मय पचपुते, हृषिकेश माळी, हर्ष देशमुख, हर्षवर्धन माळी, कनिष्क पाटील, इशिका कासार, श्रद्धा देशमुख, हर्षदा माळी, अक्षरा कासार, अक्षरा चौधरी, अनामिका रॉय, समृद्धी माळी आदींनी केले होते.

close