shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारनेर महाविद्यालयात गुळवेल या औषधी वनस्पतीची यशस्वीरित्या निर्मिती


 प्रतिनिधी : रफिक शेख

 पारनेर : (दि .५ ) : पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय भारत सरकार , वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, यांच्या वतीने अमृता फॉर लाईफ या मोहिमेतंर्गत गुळवेल या औषधी वनस्पतीची रोपे तयार करण्यासाठी डॉ. दिगंबर मोकाट यांनी पारनेर महाविद्यालयाला विचारण्यात आले होते.त्यांच्या पत्राला महाविद्यालयाने तत्काळ होकार देऊन गुळवेल या औषधी वनस्पतीची दहा हजार रोपे आत्तापर्यंत तयार केली आहेत .

 या रोपांपासून जवळ जवळ महाविद्यालयाला ५० हजार रुपये आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत. महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर, पर्यावरण पूरक वातावरण आणि तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी अतिशय परिश्रम,काळजी घेऊन गुळवेल या औषधी वनस्पतींचे संवर्धन केलेले आहे. या निमित्ताने पारनेर तालुका परिसरात गुळवेल या औषधी वनस्पतीची प्रथमच ओळख होत आहे .


 या औषधी वनस्पतीला पाहण्यासाठी नागरिक उत्साहाने महाविद्यालयात येत आहेत. भविष्यकाळात गुळवेल औषधी वनस्पतीची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.यादृष्टीने महाविद्यालयाने उचललेले हे पाऊल खूप महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महाविद्यालय नेहमी समाजाच्या दृष्टीने सामाजिक दृष्टिकोनातून व विद्यार्थी हित लक्षात घेऊन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमी राबवित असते. परंतु महाविद्यालयाने राबवलेला उपक्रम हा समाजापर्यंत जावा आणि समाजातील नागरिक, शेतकरी या सर्वांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा या दृष्टीने महाविद्यालयाने गुळवेल या औषधी वनस्पतीची रोपे तयार करण्याचे ठरवले आहे. गुळवेल या वनस्पतीची रोपे तयार करणं किती आवश्यक आहे आणि त्यातून किती चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो यावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना या पुढील काळात महाविद्यालय मार्गदर्शन करणार आहे.

             प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, विभागप्रमुख डॉ.रविंद्र देशमुख यांनी गुळवेलाची रोपे तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.डॉ.सजन खपके, प्रा.राणी शेख, प्रा. भारत चौधरी, प्रा. तुषार चिकणे, प्रा.रमा शिंदे , प्रा.रिहाना शेख , प्रा.तुषार जगदाळे , बर्डे सुभाष, जीवन जाधव या सर्वांनी गुळवेलाची रोपे तयार करण्यासाठी परिश्रम घेतले.
close