प्रतिनिधी । मोहन शेगर, सोनई :
सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने येथून बदली करावीं. अशी मागणी सोनई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदिपदादा कुसळकर व अनिल निमसे यांनी मुख्यमंत्री आरोग्य मंत्री जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नेवासा यांच्या कडे अर्जाद्वारे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते, संदीप कुसळकर
या बाबत सविस्तर माहिती अशी की कोवीड (१९) सुरू झाल्या पासुन आज पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई या केंद्रातून गेल्या एक वर्षापासून रॅपीड अँटी जन टेस्ट आर टी पी सी च्या किट तसेच सध्या सुरू असलेल्या लसीकरणात भ्रष्टाचार आजही सर्रास पणे चालू असुन यांवर आवाज उठवला तरी वैद्यकीय अधिकारी यांच्या वर कारवाई का होतं नाही?हा एक गहन प्रश्न आहे.
हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न असून गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत असुन आजपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. या मध्ये आम्हांला असे आढळून आले की येशील वैद्यकीय अधिकार्यांचे संबंध आरोग्य मंत्री ना राजेशजी टोपे साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आशिर्वादाने यांची बदली होत नाही, व यांचाच आशिर्वादाने सदर भ्रष्टाचार चालु असल्याचे भासत आहे.
या वरुन असे दिसून येते की प्राधमिक आरोग्य केंद्र,सोनई सह १५ गाव असलेल्या गावांची लोकसंख्या पाहता ६० ते ७० हजार इतकी आहे.या ठिकाणी असलेल्या पेशंटला खाजगी रुग्णालयात पाठविले जाते, तसेच पेशंटचे चेक अप ही करत नाहीत, मांजरी सारख्या छोट्या आरोग्य केंद्रां मध्ये वर्षभरात १०० ते १५० महिलांच्या डिलीव्हरी होत असतात. त्या तुलनेत सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा असुनही फक्त १० ते २० डिलीव्हरी होत असतात. आरोग्याचे वैद्यकीय अधिकारी व भाऊ वाहन चालक व आशा सेविका भाऊजई म्हणून कार्यरत आहेत. हे तिन्ही लोक आरोग्य केंद्राच्या दृष्टीने कोणतेही काम करत नाहीत. यांच्या वर कारवाई होणार का? प्रत्येक वेळी आशा सेविकांवरच अन्याय होत राहणार का? या मध्ये ज्युनिअर डॉ. यांना सुध्दा मनापासून सेवा करु दिली जात नाही.
सध्या सुरू असलेल्या कोवीड लसीकरण मधे एक लस १०००-७००-५०० रुपयांत लस विक्री केली जाते. ज्या लोकांकडुन पैसे घेतलें जाते. त्या लोकांना ऑफलाईन लस दिली जाते. त्यामुळे त्यांना आँनलाईन सटफिकेट मिळण्यासाठी खुप अडचणी येत आहेत.
३ वर्षांपूर्वी आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन जाऊन हिवताप थडीताप मलेरिया आशा अनेक रोगाचा तपासण्या व नोंदी घरोघरी जाऊन केल्या. शासनाने त्यांना मानधन दोन हजार दिले होते, ते सर्व पैसे ह्या वैद्यकीय अधिकारी यांनी गिळंकृत केले आहे. याची चौकशी होऊन वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी कुसळकर व निमसे यांनी अर्जाद्वारे संबंधितांना केली आहे.

