shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

प्रतिनिधी । जगदीश का. काशिकर :
सोलापूर:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यानिमित्ताने सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीत आयोजित कार्यक्रम व विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आली.

सदर बैठकीत माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रकाश यलगुलवार, सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंगबिग्रेड अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, ज्येष्ठ नेते मेकाले गुरुजी, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, माजी सभागृहनेता देवेंद्र भंडारे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष बाबा करगुळे, भटक्या विमुक्त जाती जमाती शहराध्यक्ष भारत जाधव, पदवीधर सेल अध्यक्ष उपेंद्र ठाकर, प्रदेश प्रतिनिधी राजन कामत, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, रमाकांत साळुंके, यांनी आपले विचार व्यक्त केले

यावेळी गटनेते चेतन चेतन नरोटे, कार्याध्यक्ष अरुणकुमार शर्मा, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देविदास गायकवाड, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, नगरसेविका परविन इनामदार, अनुराधाताई काटकर, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, सुमनताई  जाधव, मागासवर्गीय सेल अध्यक्ष उमेश सुरते, जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर,  जेम्स जंगम, हारुण शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, प्रवक्ते हसिब नदाफ, नुरअहमद नालवार, वैभव जगताप, योगेश मार्गम, संजय गायकवाड, श्रीकांत दासरी, रजाक कादरी, श्रीधर काटकर, बसवराज प्रचंडे, रोहित भोसले, श्रीनिवास येलदी, आदी उपस्थित होते.

सदर बैठकीचे आभार सरचिटणीस मनीष गडदे यांनी मानले.
close