shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांना कोविड प्रतिबंधक औषध व मास्क वाटप.

विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांना कोविड प्रतिबंधक औषध व मास्क वाटप.

इंदापूर प्रतिनिधी: (२४ ऑगस्ट २०२१)इंदापूर येथील विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने अकॅडमीच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग या सर्वांना कोविड प्रतिबंधक होमिओपॅथी औषध तसेच N95 मास्क याचे वाटप अकॅडमी चे अध्यक्ष प्राध्यापक कुणाल काळे सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

विद्यार्थी व शिक्षकांनी कोविड प्रतिबंधक उपाय योजनेकडे दुर्लक्ष न देता सामाजिक अंतर ठेवून तोंडाला  मास्कचा वापर करून आणि हात स्वच्छ करूनच अकॅडमी मध्ये अभ्यास वर्गात यावे यासाठीच विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी ने हा उपक्रम राबविला आहे. तसेच सध्या या ॲकॅडमीमध्ये २५ विद्यार्थी शिक्षण घेत असून अतिशय शिस्तबद्ध आणि प्रसन्न वातावरणात या विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांमार्फत मार्गदर्शन मिळत असून यामुळे पालक आणि विद्यार्थी यांचा ॲकॅडमीकडे कल वाढत असल्याचे मत यावेळी प्राध्यापक कुणाल काळे यांनी सांगितले.

इंदापूर शहरात विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमीने अल्पावधीतच अतिशय शिस्तबद्ध नियोजनातून विद्यार्थी यांना अतिशय खात्रीशीर अद्यावत सर्व सोयींनी युक्त विद्येचे दालन तयार करून यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे प्रयत्न केले असल्याचे दिसते. या अकॅडमी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.
close