shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. उषा जयसिंग भोईटे यांची महिला शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती

डॉ. उषा जयसिंग भोईटे यांची महिला शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: (२४ ऑगस्ट २०२१) शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या कडील शासन निर्णयानुसार डॉ. उषा जयसिंग भोईटे यांची इंदापूर तालुका स्तरीय शिक्षण सल्लागार समिती मध्ये महिला शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे नियुक्ती पत्र मा. जिल्हाधिकारी,पुणे डॉ. राजेश देशमुख यांनी पंचायत समिती इंदापूर यांना दिले आहे. 
      डॉ. उषा भोईटे यांचे इंदापूर तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान आहे. त्यांना आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. विध्यार्थी सर्वांगीण विकासाकरिता त्यांनी सर्व प्रकारची प्रशिक्षण घेतली आहेत. त्यांनी इंदापूर तालुक्यावर संशोधन केले असून त्या इतिहास विषयात सेट ही अत्त्युच्च पदवी तसेच पी एच डी प्राप्त असलेल्या इंदापूर तालुक्यातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांच्या या निवडी बद्दल मा. गट विकास अधिकारीविजयकुमार परीट साहेब, गट शिक्षणाधिकारी मा. राजकुमार बामणे साहेब तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी आनंद व्यक्त करून कौतुक केले आहे.

डॉ. उषा भोईटे या सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लुमेवाडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
close