================================= प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
======================= केज तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी २०१९ या वर्षी भेटलेले निष्क्रिष्ट दर्जाचे मोबाईल परत करून नवीन चांगल्या प्रतीचे मोबाईल फोन भेटावेत म्हणून आंदोलन केले. हे आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश जिल्हा व तालुका स्तरावर चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पोषण अॅप मराठी भाषेतून करण्यात यावे ही मागणी देखील करण्यात आली. इंग्रजी भाषेत आसलेले पोषण अॅप समजण्यासाठी व त्या मध्ये माहिती भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी अनेक अडचणी येत आहेत याचा शासनाने विचार करून पोषण अॅप मराठी भाषेतून करून अंगणवाडी सेविकांनी न्याय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ ठाणे या संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले व त्यामध्ये कोरोना नियमाचे पुर्ण पणे पालन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास तसेच सर्व जिल्हा परिषद व प्रकल्प अधिकारी केज यांना निवेदन देऊन त्वरित मागण्या मान्य करव्यात नसता या पेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सदरील आंदोलनात राज्य कर्मचारी संघ ठाणे या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संध्या पी. मिश्रा, जिल्हा उपाध्यक्षा वायबसे अनुसया सुंदरराव, सचिव घोळवे सिंधू, केज तालुकाध्यक्षा इरफाना शेख, लता सत्वधर अंगणवाडी सेविका व मिरा चंद्रकांत नेहरकर अंगणवाडी सेविका यांनी सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ ठाणे संघटनेच्या केज तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
केज तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या रास्त मागण्या शासनाने मान्य करून आम्हाला न्याय द्यावा, आमच्या महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ ठाणे या संघटनेच्या माध्यमातून यापुढे देखील अंगणवाडी सेविकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आंदोलन करू व गरज पडल्यास रस्त्यावरपण उतरू
________
वायबसे अनुसया सुंदरराव जिल्हा उपाध्यक्षा

