shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार रोहिदास दातिर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी‌ कान्हु मोरे मिस्टर इंडिया स्टाईलने फरार; अहमदनगर जिल्हा रुग्णायात सुरु होते उपचार..!!

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी -दिपक हरिश्चंद्रे)                                                   

राहुरी: शहरातील पत्रकार  रोहिदास दातीर खून प्रकरणातील  मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (राहणार वांबोरी, वय ४६ ) याने पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे.  आज शनिवारी सायंकाळी ०५:१५ वाजता नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या उपचारादरम्यान आरोपी मोरे यांनी मिस्टर इंडिया स्टाईलने धूम ठोकली आहे. जिल्ह्याभरातील पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे.

         
०६ एप्रिल रोजी दुपारी १२:१५ वाजता पत्रकार दातीर यांचे अपहरण, जबर मारहाण करुन खून करण्यात आला. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी कान्हू मोरे घटनेनंतर बारा दिवस दक्षिण भारतात पसार झाला होता. पैसे संपल्याने, तो नेवासा फाटा येथे एका हॉटेल जवळ वेषांतर करुन आला होता. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सापळा लावून त्याला शिताफीने  अटक केली होती. त्याची दहा दिवस पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी आरोपी मोरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याची रवानगी अहमदनगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आली. त्याला, पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. आज शनिवारी सायंकाळी ०५:१५ वाजता  लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने, आरोपी मोरे याने जिल्हा रुग्णालयातून नगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, धूम ठोकली. त्याची उंची पाच फूट असून, अंगात पिवळा शर्ट घातला आहे. अंगाने लठ्ठ असून, दाढी वाढलेली आहे. त्याचा जिल्हाभरातील सर्वच पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत.

Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  📲7350591600
close