प्रतिनिधी : आसावरी वायकर
जळगाव : २९ / धरणगाव शहरात पाणीपुरवठा तब्बल १६दिवसांत येतो.गौतमनगर मधे तर २३ दिवसांत आला. तो ही फक्त एक तास.म्हणून महिलांची माथी भडकली. मोर्चा काढला. अध्यक्षांना बांगड्या भेट दिल्या .
असे अनेक मोर्चे निघाले.बैठका झाल्या.निवेदने दिली. चर्चा केली.तरीही पाणी पुरवठा वाढवला नाही. फलित काय ,तर मोर्चे काढणाऱ्यांवर गुन्हे. पाणी मागणाऱ्यांवर गुन्हे.
धरणगाव चे आमदार हेच जिल्हाचे पालकमंत्री.धरणगाव चे आमदार हेच पाणीपुरवठा मंत्री तरीही पाणीटंचाई?हमारे होते हुए,हमारे जेलमे सुरंग! रहस्यमय कहाणी आहे?
मोठे रहस्य आहे.संशोधन झाले पाहिजे. आता धरणगाव च्या नागरिकांनी याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.
आपल्या सोयी सुविधांसाठी आपल्या मताने नगरसेवक, आमदार निवडून दिला पाहिजे. ही कळ आम्ही धरणगाव च्या नागरिकांच्या हातात आहे.पण आम्ही पांचशे रूपये घेऊन चुकीच्या जागी कळ दाबली आहे. तेंव्हा आम्हाला पांचशे रुपये मिळाले.त्याचा परिणाम आमची बुद्धी बधीर झाली. जशी दारू पिऊन होते तशी.तेंव्हा विचार केला का, ही कळ दाबण्याचा आधिकार आपल्याला का मिळाला असेल? ही कळ तहसीलदार, कलेक्टर, राज्यपाल, राष्ट्रपती यांनी परस्पर न दाबता आम्हाला धरणगाव च्या लोकांना का सांगितले असेल?तसे तर परस्पर कळ दाबून त्यांना पाहिजे त्या माणसाला निवडून आणले असते.तरीही आम्हाला का हे कष्ट करायला सांगितले? खेतीबाडी,दुकानदारी,शाळा शिकवणी सोडून हे काम आम्ही धरणगावच्या लोकांना का सांगितले असेल? त्यांना ही कळ दाबता येत नव्हती का?
धरणगाव ला रस्ते पाणी,गटार,शाळा, दवाखाना बाबत काय समस्या आहेत ते मुंबई, दिल्लीच्या लोकांना माहिती नसतात.माहीत केले तरी जितकी तकलिफ, अडचण ,कटकट आम्हाला होते तितकी त्यांना होत नाही. म्हणून ते आमची तक्रार, आमचा कागद कचरापेटीत टाकतात.असे खूप येतात आमच्याकडे.ते म्हणतात, मुर्खांना मतदानाचा आधिकार दिला. मशीन घेऊन त्यांच्या गावात घेऊन गेलो.त्यांना बोलवले.या,कळ दाबा.तुम्हाला पाहिजे त्या उमेदवाराची कळ दाबा.तुम्हाला कोण माणूस नगरसेवक पाहिजे?कोण माणूस आमदार पाहिजे?ते तुम्ही ठरवा.आणि तुम्ही मुर्ख लोकांनी ते आधिकार पांचशे रूपयात विकून टाकावा का?म्हणजे आम्ही या लोकांच्या भल्यासाठी हा उपद्व्याप केला.इतकी उठाठेव केली.निवडणूक घेतली. आणि निवडले कोणाला?चुकीच्या माणसाला. आता तोच माणूस नगरसेवक किंवा अध्यक्ष झाला तर चूक कोणाची? चुकीचा माणूस आमदार झाला तर चूक कोणाची?तहसीलदार ची?कलेक्टर ची?राज्यपालची?राष्ट्रपतीची?निवडणूक आयोगाची ? कि धरणगावच्या लोकांची?
ही चूक आम्ही मतदारांची आहे. धरणगाव च्या नागरिकांची आहे. ज्यांना पाणीटंचाई झाली, त्यांची आहे.तर मग,आता भरा मडके,गाडगे.मारा बोंबा.काढा मोर्चा. जा जेलमधे.फिरा कोर्टात.
मित्रांनो, आता तुमच्या नगरपालिकेत बसलेले लोक तुम्ही निवडून दिलेले आहेत.त्यांना बरेवाईट बोलून,बांगड्या भरून ही ते घाबरत नाहीत. मचकत नाहीत. का?निवडून येण्याआधी तुम्ही बाप होते.निवडून आल्यानंतर ते बाप बनलेत.पोलीससुद्धा त्यांचे संरक्षण करतील. कोर्ट सुद्धा त्यांचीच बाजू घेतील. का?ते लोक लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत.तुम्हीच निवडून दिलेले आहेत.पोलीस किंवा न्यायाधिशांनी नाही. तर मग,सांगा चूक कोणाची?
सरकारने तुमच्या आमदाराला पाणीपुरवठा मंत्री बनवले. का बनवले?धरणगाव ला पाणीसमस्या आहे म्हणूनच.तक्रारी आहेत म्हणूनच.निधीही दिला.पाणीपुरवठा योजना राबवावी म्हणूनच.तरीही तुम्हाला पाणी मिळत नसेल तर चूक कोणाची? सरकारची कि आमदारची? जरी आमदार तुम्ही निवडून दिला असला तरी तुम्ही आमदाराचे काही एक बिघडवू शकत नाहीत. त्यांची गाडी अडवू शकत नाहीत. तसे केले तर तुम्हीच गुन्हेगार. जा जेलमधे.तुमच्यावर आरोप लागेल कि,हे आमदाराला मजा मारू देत नाहीत.
तुम्ही म्हणाल कि आम्हाला मताचे पांचशे रुपये ही पाहिजे आणि पाणी ही पाहिजे. असे शक्य नाही. एकतर पांचशे घ्या किंवा पाणी घ्या.दोन्ही पैकी एकच मिळेल.हाडूक आणि गुलामजामून एकाच वेळेला चघळता येत नाही.काय पाहिजे?निती कि अनिती?साव कि चोर? हे पाहिजे कि ते ?तुम्ही ठरवा?
पैसा पाहिजे कि पाणी?
पेरणी करतांना बैल पांबर ओढत नसेल ,बसून गेला असेल तर त्याला शेतकरी किती हाणतो?उठायची,चालायची शक्यता असेल तोपर्यंत. काठी मारून, आर टोचून ,शेपटी चुरगळून ही उठत नसेल तर,शेतकरी त्याचा नाद सोडून देतो.दुसरा बैल आणतो.पेरणी करतो.नंबर बठ्या बैल कसायाला विकून टाकतो.हे शहाणपण तुम्हाला शेतकरी कडून शिकावे लागेल.बैल महत्त्वाचा कि पेरणी महत्त्वाची?तसे धरणगाव ला, आमदार महत्त्वाचा कि पाणी महत्त्वाचे?ते तुम्ही ठरवा.
.....शिवराम पाटील
9279963122
महाराष्ट्र जागृत जनमंच.

