प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि.२९/ करमाळा तालुका शहर (सावंत गल्ली) येथील सलीम शेख यांची मुलगी सानिया शेख हिचा विवाह ११/११/२०१८ या दिवशी झाला होता. लग्नानंतर जेमतेम पंधरा दिवस सासरच्या लोकांनी तिला सांभाळले पंधरा दिवसानंतर सासरच्यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी साठी मुलीला माहेरहून पैसे आण अशी मागणी केली.
मुलीच्या माहेरची परिस्थिती जेमतेम आहे मुलीचे वडील ड्रायव्हिंग करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात अशा परिस्थितीत मुलीने सासरच्यांना आईवडिलांकडे पैसे मागण्या नकार दिला त्यामुळे सासरच्यांनी तेव्हापासून मुलीचा छळ करणे चालू केले तिला उपाशी ठेवणे मारहाण करणे अपशब्द वापरणे असे प्रकार चालू केले नाहीतर माहेर निघून जा अशी धमकीही दिल्ली बऱ्याच वेळा रात्री अपरात्री तिला घराबाहेर देखील काढले शेवटी मुलगी माहेर कडून पैसे आणत नाही नाही म्हणून सासरच्यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून बोलून घेतले व पैसे द्या नाहीतर आम्ही मुलगी नांदवित नाही तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा असे सांगितले.
मुलीच्या जीवाला सासरच्या लोकांकडून धोका आहे हे लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी मुलीला आपल्याबरोबर माहेरी घेऊन आले. व *करमाळा पोलीस* स्टेशन येथे सासरच्या विरोधात १२/८/२०२१ रोजी तक्रार नोंदवली. तरी या गुन्ह्यासंदर्भात आणखीन कोणतेही दखल घेतलेली नाही तरी करमाळा पोलीस स्टेशन ने लवकरात लवकर या गुन्ह्याची दखल घ्यावी व मुलगी व तिच्या आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी संबंधीताची माफक अपेक्षा आहे .

