shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार नानासाहेब चेडे यांची डिटीएड,बी एड स्टुडंट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाअध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी : संजय वायकर

शेवगाव : (दि. 29 ) :  शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील नानासाहेब चेडे यांची डिटीएड, बी एड स्टुडंट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


 रविवारी दि. 29 रोजी औरंगाबाद येथे संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष संतोष मगर,  कार्यालयीन सचिव बाळासाहेब गडदे, राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती सगट यांनी चेडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. राज्यात डिटीएड बीएड विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाबाबत संघटना पाठपुरावा करून शासनदरबारी पारदर्शकपणे शिक्षकभरती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातही यापुढे संघटनेचे कार्य मोठ्या जोमाने सुरू केले जाणार असल्याचे चेडे यांनी सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चेडे यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
close