पिंपरी चिंचवड:-फुगेवाडीत घर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली लहान मुलगी अडकली असून बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आज शनिवारी (दि.28) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मुख्य अग्निशामक केंद्र, पिंपरी यांच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.45 वा फुगेवाडीत घर कोसळले असून ढिगाऱ्याखाली लहान मुलगी अडकली असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य प्रगती पथावर आहे. अधिकची माहिती अद्याप समजू शकली नाही असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

