भावी भक्तांनी गर्दी करु नये असे आव्हान तांदळी वडगाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले..!!
नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथील धर्मनाथ देवस्थान आहे. या देवस्थानाला खुप पुरातन इतिहास आहे.हे देवस्थान मुक्या जनावरांना पावणारा देवस्थान आहे.रितिरिवाजा प्रमाणे मोजक्या भावीक भक्तां उपस्थित धर्मनाथ देवस्थान या सप्तासा उभारला उद्या म्हणजे सप्ताह शेवटी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असतो.या देवस्थानाला आसपासचा गावातील भाविक भक्त आपल्या घरची पाळीव जनवारे धर्मनाथ दर्शना साठी घेऊ येत असतात, या देवस्थानाला बैल गाय जनवारे प्रदिक्षणा घालून.
असतात या ठिकाणी प्रसाद स्वरुपात कन्या आमटी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. प्रत्त्येक भावीक प्रसाद घेऊन आपल्या मार्गाने मार्गस्थ होतात. या वर्षी करोना संकटं आजुन टळलेले नसल्याने (दि २८) वार शनिवार रोजी तांदळी वडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे हे प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.तरी नगर तालुक्यातील व जिल्हा भावी भक्तांनी यांची दखल घ्यावी. असे आव्हान करण्यात आले आहे.या पत्रकावर संरपच बाळासाहेब ठोंबरे, ग्रामसेवक पिंपळे यांची स्वाक्षरी आहे. या विषयी नगर तालुका पोलिस प्रशासन पत्राद्वारे कळवले आहे.

