shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते..!!

आ. रामभाऊ सातपुते यांचा आधार; रुग्णाला मिळाला मोफत उपचार

हॅलो आमदार राम सातपुते बोलतोय .....

अगदी सर्वांना हक्काचं वाटणारे नेतृत्व म्हणजे "रामभाऊ".

एक संवेदनशील नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार रामभाऊ.

ज्या व्यक्तीने स्वतःच्या घरामध्ये गरिबी पाहिलीये,ज्या व्यक्तीने गरिबी काय असते ती अनुभवली आहे,असा व्यक्ती कसा गोरगरीबांना रुग्णालयाच्या विषयांत त्रास होऊन देणार...!

अगदी निम्यारात्री जरी फोन आला की हॅलो...आमदारसाहेब,

मी ह्या ह्या गावातून बोलतोय माझ्याकडे पुरेशे पैसे नाहीतं उपचाराला आणि या कारणामुळे माझा उपचार रुग्णालयाकडून लांबणीवर टाकण्यात येत आहे.... रामभाऊ लगेचं फोन फिरवणार आणि कुठल्या योजने अंतर्गत त्या गोरगरीब लोकांना फायदा होऊन त्यामध्ये आमदारसाहेब स्वतः डॉक्टरांशी बोलणार किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार आणि त्या रुग्णाला हवी ती मदत पुरवणार.



आमदारसाहेबांचे आरोग्यसेवक मुंबई - पुणे येथे कार्यरत आहेत.

साहेबांचा फोन थेट जातो या आरोग्यसेवकांना हे ही तेवढयाचं तळमळीने त्या रुग्णांच्या संदर्भात रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांशी आमदार साहेबांच्या पत्राद्वारे हवी ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

 

विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी चळवळीत रामभाऊंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. भाऊंचा संघर्ष आम्ही सर्वांनी पाहिला आहे.

भाऊ संघर्षातुन आमदार झाले,

आजही भाऊंना गोरगरीब जनतेविषयी तितकीचं तळमळ जेव्हा भाऊंच्या मनात विद्यार्थी चळवळीत असतांना होती.

आत्तापर्यंत बरेचं कॅन्सर रुग्ण,बरेचं काही मोठे आजारांनी त्रस्त असणाऱ्या गोरगरीब जनतेला साहेबांनी मोफत उपचार मिळवून दिले आहेत.

आमदारसाहेबांचे एक वैशिष्ट्य मी नमूद करून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमदार साहेब कधीचं प्रसिद्धीहेतू या गोष्टी करीत नाहीत.

निःस्वार्थपणे गोरगरिबांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे,

आपण समाजाच्या उपयोगी पडलो पाहिजे हेचं रामभाऊंचे ध्येय आहे.

अगदी सहजरित्या कार्यकर्त्यांना आपल्या कठीण समयी एका फोन वर मदतीसाठी तत्पर असणारा नेता म्हणजे रामभाऊ.

गतिशील,कार्यतत्पर,संघर्षयोद्धा आमदार रामभाऊ सातपुते...अर्थातचं "आरोग्यदूत."

लेखक : सिद्धार्थ गिरमे.

(साहेबांचा स्वीय सहाय्यक)

संकलन - तुषार महाजन. पत्रकार शिर्डी

close