कर्जाचे बोजाने व जप्तीच्या भितीने उडालेली झोप... प्रतिष्ठेला डाग लागू नये म्हणून..... दररोज सतावणारी चिंता.... रोजगार अभावी उदरनिर्वाहाची मारामार...... त्यात देणेदारी व विजबिलाचा भार... विवंचनेत होणारी उपासमार.. या टेन्शनमध्ये शिर्डीचा रुतलेला अर्थकारणाचा गाडा ..... लवकर रुळावर यावा यासाठी..... साई मंदिर खुले होण्याच्या प्रतिक्षेत व्यावसायिक व नागरिक आपले स्वास्थ्य हरपून व्याधींना निमंत्रण देताहेत असे असताना मात्र हा जन्म पुन्हा नाही..... हे वास्तव स्विकारून शिर्डीतील वयाची पंच्चावन्नी गाठलेल्या त्या भाऊने ओ शेठ ..तुम्ही नादच केलाय थेट झिंग झिंगाट. ..वाजले की बारा. .लावणीवर धरलेल्या ठेक्याने धम्माल उडवून देत सोशल मिडीयावर धूम ठोकली आहे त्यामुळे नेटककरी वर्गात राज्यात ओ... शेठ ची तर शिर्डी सह पंचक्रोशीत भाऊशेठची चलती सोशल मिडीयावर दिसून येत आहे
कोरोना महामारीत शिर्डीसह पंचक्रोशीचे अर्थकारण ढासळल्याने अनेकजण वेगवेगळ्या चिंतेने ग्रासले आहेत... आजचा प्रश्न उद्या सुटणार आहे... आजचे संकट कदाचित उद्याची संधी असू शकेल.. आउटपुट शून्य देणारे प्रश्न मनाशी खिळवून ठेवत चिंता लावून बसत भविष्यात व्याधींना निमंत्रण देण्यापेक्षा.. आला तो दिवस आपला... उद्याचा काय ? भरोसा.... सकाळी सुर्योदय बघीतला... संध्याकाळी सुर्यास्त बघायला.... मिळेल का ? नाही याची शास्वती नसलेल्या या औटघटकेच्या जिवनात...जिवाचा अन् जगायचा क्षणाचा काय ? भरोसा हाय म्हणून तर या जगण्यावर.. या जन्मावर.. शतदा प्रेम करावे.... या तत्वानुरुप जीवनाचा मनमुरादपणे आनंद लुटणारा शिर्डीकरांचा पंचावन्नीचा तो तरुण भाऊसाहेब विश्वनाथ भोसले सोशल मीडियावर धूम ठोकून भल्याभल्यां तरूणांना भुरळ घालत अनेकांना आपलं वय आणि भान हरपून जाण्यास भाग पाडत आहे भक्तीगीत....... भावगीत... सिनेगीत... असो अथवा लावणी संगीत व गाणं कुठलही असो भाऊ भोसलेचा ठेका अन् थिरकन म्हणजे इतरांसाठी नादच खुळा होय..!
ओ... सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट गाण्यावरील डान्स अथवा ठसकेबाज लावणीवर धरलेला भाऊंचा ठेका हा सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. .. झिंगाट झाल्याशिवाय अनेकांना ठेका धरता येत नाही मात्र व्हिडीओ क्लीपव्दारे भाऊ भोसलेंचा ठेका बघताच अनेकांचे अंगात डान्स शिरल्याशिवाय राहत नाही..भाऊशेठचा ठेका अबालवृद्धांना नृत्य व मनोरंजनाकडे आकर्षित करणारा ठरत आहे हा जन्म पुन्हा नाही तसेच संकट व संघर्षांशिवाय जीवन नाही हे वास्तव स्विकारून तो हरिनामात तल्लीन होतो एवढेच नव्हे तर साठीतला पुरुष असूनही त्याने लावणीवर व ओ.. शेठ गीतावर धरलेला ठेका अनेकांना चिंतामुक्त आनंददायी जिवन जगण्याची सरळ वाट दाखवित आहे त्यांचा विश्वास आहे आजची चिंता दुर होऊन नष्ट होईल परंतु चिंता विवंचना सोडली नाही तर मधुमेह . . रक्तदाब. मनोविकार जडल्याशिवाय राहणार नाही मग आपले जगणे असह्य होईल हे नक्की जान है तो जहान है समजून जगा व या मानवजन्माचा आनंद लुटा असाच संदेश भाऊशेठ सध्या सर्वांना देत आहे हे मात्र तितकेच खरे आहे.

