shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मेगा कंपनीच्या गलथान पणामुळे पुन्हा अपघात..!!

पूल दुरुस्तीच्या कामावर सूचना दर्शक फलक नसल्याने दुचाकी घसरून पती-पत्नी जखमी.!!

----------------------------------------

              

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                            

राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्या प्रवाशी आणि वाहनचालकांच्या जिविताची काळजी घेत नसल्याने दररोज अपघात घडत आहेत. मात्र त्याकडे संबंधित कंपन्या आणि देखरेख करणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.



दि. ११ ऑगस्ट रोजी केज ते साळेगाव दरम्यान मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही महामार्ग क्र. ५४८-सी चे काम करीत आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना सूचना दर्शक फलक किंवा रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लक्षात येण्यासाठी रिफ्लेक्टर याची लावणे आवश्यक आहे. मात्र कंपनीने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री ८:३५ वा. कळंब कडून दुचाकीवर प्रवास करणारे राहुल गुलाब तुपारे वय २५ वर्ष राहणार केवड ता. केज व त्यांची पत्नी हे दोघे जात असताना अडथळा म्हणून रस्त्यात्यावर टाकल्या मुरमावरुन घसरून पडले. यात राहुल तुपारे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या पत्नी जखमी झाली आहे. -----------------------------------------

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लक्ष देणार का? :- मेल कंपनीद्वारे केलेले रस्ता बांधण्याचे काम हे अनेक ठिकाणी उघडले असून रस्त्याला तडे गेले आहेत तसेच रस्त्याच्या फुलावर चे काम देखील समपातळीत झालेले नाही. त्यामुळे रस्ता खराब झालेल्या ठिकाणी रस्ता खोदून पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र रस्ता दुरुस्ती करीत असताना या कंपनीने रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहनधारक यांची कोणतीही सुरक्षेची जबाबदारी न घेता किंवा रस्त्यावर त्या संबंधित सूचना फलक न लावता काम सुरू आहे.

------------------------------------------

पाच किलो मीटर अंतरावरून येण्यासाठी रुग्णवाकीला लागला पस्तीस मिनिटांचा वेळ ! :- वारंवार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचेशी संपर्क साधून ही तब्बल अर्धा तासा नंतर सदर रुग्णवाहिका आली. तो पर्यंत अपघातातील जखमी राहुल तुपारे हा रस्त्यावरच वेदनेने तळमळत पडलेला होता. 

----------------------------------------

अपघातग्रस्तांना ग्रामस्थांची मदत :- अपघात झाल्यानंतर तेथून जात असलेला सारे गावातील तरुण रमेश इंगळे यांनी हा अपघात पाहिला आणि त्यांनी जखमींना मदत केली तसेच त्यानंतर त्याने पत्रकार गौतम बचुटे कमलाकर राऊत बलभीम बचुटे, जय जोगदंड अक्षय वरपे, लांडगे, विवेक बचुटे, संभाजी शिनगारे, नवनाथ धिवार यांना मदतीला बोलवून घेतले. त्या नंतर गावकऱ्यांनी त्याचे नातेवाईक व रुग्णवाहिकेचीशी संपर्क साधून जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.

close