राहुरी: तालुका प्रतिनिधि (शिर्डी एक्स्प्रेस करीता -दिपक हरिश्चंद्रे)
🌀नगर-मनमाड महामार्गावरील आजचे महाराष्ट्रातील हे पाहिलेच आंदोलन🌀
‘पेटा गाडा, बैल सोडवा’, बैलगाडी शर्यती सुरू करा, अन्यायकारक बंदी उठवा , अशा घोषणांनी संपुर्ण परीसर, शहर दणाणून सोडत राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच बैलगाडा मालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ते यांनी घोडा व बैलांसह रस्ता रोको आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतप्रेमी व शेतकरी सहभागी झाले होते.
‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी दिनांक ११ रोजी राहुरी बाजार समिती समोर शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसमवेत रस्त्यावर उतरून, राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्गावर बैलांची सवाद्य मिरवणूक काढून, भंडारा उधळीत "पेटा हटवा. बैल वाचवा" अशा घोषणा देत, शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर चककाजाम आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.धनराज गाडे, रवींद्र हापसे, प्रशांत शिंदे, बाळासाहेब जाधव, महेश लांबे आदींसह अनेक शेतकरी वर्ग आणि बैल- गाडा प्रेमी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे म्हणाले की,"बैलगाडा शर्यतीची राज्यात जवळपास चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहे. हा पारंपरिक असणारा वारसा व शेतकऱ्यांचा हा आवडता छंद या दृष्टिकोनातून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. त्यासाठी देशी गायी व बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे करावे लागते. परंतु बैलांच्या प्रदर्शन व शर्यतीवरील बंदीमुळे बैलांच्या असणाऱ्या जाती नामशेष होतील कि काय ? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे बैलांच्या संगोपनाची प्रेरणा नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देव-देवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते."
तसेच बैल गाडा शर्यत करीता लागणारे साहित्य बनविणारे कारागीर देखिल या बंदीमुळे बेरोजगार होत चालले आहेत.
शेतकरी बैलांना आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळतो जीव लावतो ; बैल आणि शेतकरी हे नाते शेकडो वर्षांपासून असल्यामुळे बैल हा जंगली प्राणी कसा होऊ शकतो ?असा प्रश्न देखिल यावेळी समस्त शेतकरी आणि बैल - गाडा प्रेमींनी उपस्थिती केला.
सदरचे निवेदन स्वीकाण्या करीता तहसीलदार यांच्या अनुपस्थतीमुळे आंदोलनकर्ते शेतकरी वर्गात काहीशी नारजी पाहायला मिळाली.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600



