shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाज कल्याण नाशिकच्या प्रादेशिक उपआयुक्त पदी कोकाटे यांची बढती

  प्रतिनिधी : रफीक शेख

अ .नगर : (दि .१२) : जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांची प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण नाशिक येथे बढती झाल्याबद्दल निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.अनुदानित वसतिगृह संस्थाचालक ,अधिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृह अहमदनगर येथे कार्यक्रम संपन्न झाला .


 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक धनाजी शिंदे हे होते.यावेळी महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संस्थाचालक महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन शिक्षण संस्था अहमदनगरचे बैचे सर, जिल्हा परिषद अहमदनगरचे विस्तार अधिकारी पाराजी निमसे, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक प्रकाश साठे, जिल्ह्यातील अधिक्षक प्रकाश धोंडे, कुताळ सर,तोडमल सर,जाधव सर,कामठे सर ,बंडू शेठ भोसले सर, अधिक्षक रामकरण सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.
close