इंदापूर तालुका माळी सेवा संघ व माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वत्तीने पूरग्रस्तांना मदत - बापुसाहेब बोराटे.
इंदापूर प्रतिनिधी: महापूर आला आणि काही तासात सर्व होत्याचे नव्हते झाले. अशा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील काळकोशी, आंबवडे, कारगाव, कात्रेवाडी, मुनावळे ही गावे अतिशय दुर्गम डोंगरात वसलेली आहेत.जेथे फक्त पाण्यातून जावे लागते. बोटीमधून १ तास प्रवास करत जावे लागते..
या लोकांची जनावरे वाहून गेली, घरे मोडली, शेती वाहून गेली, डोंगर शेतामध्ये घसरून आले अशी खुप मोठी हानी झाली... त्यांची व्यथा ऐकताना कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..
मागील १०० वर्षे पडला नाही एवढा पाऊस पडला आणि लोकांची जगण्याची शर्यत चालू झाली... खूप अडचणीत असलेल्या आशा दुर्गम भागात त्या लोकांचे अश्रू पुसण्याचे भाग्य लाभले ही मोठी गोष्ट आहे.अशी माहिती इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांनी दिली.
त्यांचे दुःख मोठे आहे पण फुल नाही फुलाची पाकळी अशी छोटी मदत करता आली. आणि पुढील काही वर्षे त्या गावांना मदत करत राहायचे असे ठरले.
या कार्यात मोलाची मदत झाली ती किसन भोसले व प्रणिता भोसले या दोघांची, त्यांच्या गावाबाबत असलेली तळमळ बघून पुन्हा ऊर्जा मिळाली.
या संकटाचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. कारण आभाळ फाटले आहे. संसार मोडले आहेत. जगणे मुश्किल झाले आहे.
त्या गावामध्ये रस्ते नाहीत, मोबाईल ला रेंज नाही, दवाखान्याच्या पुरेशा सुविधा देखील नाहीत अशा गावामध्ये बोटीमधून प्रवास करून मदत पोहोच करण्याचा छोटासा प्रयत्न माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून करण्यात आला असून इतर ही सामाजिक संघटनांकडून मदत करावी असे आवाहन माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी यांनी केले आहे.
या मदत कार्यात इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार नितीनजी राजगुरू,राज्य संघटक ज्ञानदेव शिंदे,इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे,महिला अध्यक्षा वर्षाताई भोंग, तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी यांनी मोलाचे सहकार्य केले.

