shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार प्रकाश कुलथे यांची सुकन्या कु.कृपा कुलथे भारती विद्यापिठात डॉक्टर पदवी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण..!!


श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
येथील पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांची सुकन्या कु. कृपा प्रकाश कुलथे पुणे येथील भारती विद्यापिठातून डॉक्टर पदवी दुसऱ्या क्रमांकसह उत्तीर्ण झाली आहे. 

कु. कृपा कुलथे ह्यांनी श्रीरामपूर येथील दादा वामनराव जोशी नवीन मराठी शाळा, भि. रा. खटोड कन्या विद्यालय आणि रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेजमधून शिक्षण घेतले.12वी सायन्सनंतर त्यांनी पुणे येथील भारती विद्यापिठामध्ये होमीओपॅथिक विभागात प्रवेश घेऊन 2021च्या परीक्षेत बी. एच. एम. एस. ही पदवी भारती विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकासह प्राप्त केली. 

कु. कृपा कुलथे यांना बालपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती ती त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आणि अभ्यासाने प्राप्त केली. त्यांना चित्रकला हा त्यांचा सर्वात आवडता विषय आहे. क्रिकेट, वक्तृत्व, वाचन यामध्येही त्यांनी पारितोषिके प्राप्त केली.

वृत्तपत्र क्षेत्रातही त्यांना अधिक अभिरुची आहे.आई सौ. स्नेहलता कुलथे, वडील प्रकाश कुलथे. बंधू स्वामीराज कुलथे, वहिनी सौ. श्रद्धा कुलथे यांचे कौंटुबिक सहकार्य आणि प्रोत्साहन तसेच सर्व शिक्षकवर्ग यांचे आपणास उपयुक्त मार्गदर्शन मिळाले, अशा भावना कु.डॉ. कृपा कुलथे यांनी व्यक्त केल्या. 

भारती विद्यापिठाचे प्रमुख आणि कृषी व सहकार राज्यमंत्री नामदार विश्वजित कदम यांच्यामुळे प्रवेश सुलभ झाला, त्यांनी केलेले अभिनंदन हे पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल. डॉ.कृपा कुलथे यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने,  खासदार सुजय विखे पाटील, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. अरुण जाधव, माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबुराव उपाध्ये, नगराध्यक्ष अनुराधा आदिक,  उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे, प्रकाश निफाडकर, सुरेश नागरे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, श्रीरामपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे, शौकतभाई शेख, पत्रकार रमेश जेठे, सुधीर वायखिंडे, प्रेस क्लब श्रीरामपूरचे सर्व सदस्य तसेच अनेकांनी डॉ.कृपा कुलथे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
close