राहुरी: तालुका प्रतीनिधी- ( दिपक हरिश्चंद्रे).
राहुरी: आजकाल ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणे आणि पैसे मिळाले कि मग सर्व काही ठीक असा प्रकार तालुक्यात सरास पहावयास मिळत आहे; असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द, गावात घडला असून खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन संबंधितांकडून तब्बल चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या च्या कारणास्तव गुरुवार ता.-५ रोजी दुपारी ०४:०० वाजता राहुरी पोलिस ठाण्यात खडांबे खुर्द चे रहिवासी असलेल्या ०१)दिनेश बाळासाहेब सगळगीळे, ०२)अनिता दिनेश सगळगीळे, ०३)प्रतिभा बाळासाहेब सगळगीळे ०४) चंद्रशेखर पवार (सर्वजण राहणार खडांबे खुर्द, ता. राहुरी) तिघांविरद्ध श्री.रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की खडांबे खुर्द येथे ३१ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे, विनायक राजेंद्र गर्जे (रा. खडांबे खुर्द) व बापू रोहिदास ससाने (रा. गुंजाळे) यांच्यासमवेत आरोपींचे भांडण झाले. आरोपीच्या कुटुंबातील एका महिलेचे गावातील दोन जणांशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा करून, समाजात बदनामी केल्याचा आरोप आरोपींनी केला. त्यावरून वाद होऊन हे प्रकरण जास्त विकोपाला गेले. फिर्यादी रामेश्वर हरिश्चंद्रे यांनी पोलिस ठाणे गाठले आणि अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
तसेच आरोपी यांनी हरिश्चंद्रे, गर्जे व ससाने हे तिघेही काम करीत असलेल्या ट्रॅक्टर मालक भगवान गोवर्धन कल्हापुरे (रा. खडांबे खुर्द) यांच्या मोबाईलवर फोन केला आणि या तिघांनी समाजात आमची बदनामी केली. माझ्या पत्नीच्या अनैतिक संबधा बाबत चर्चा केली. त्यांच्याविरुद्ध आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून, त्यांना जेलमध्ये पाठवू. तसेच आमचे आरपीआय चे भरपूर कार्यकर्ते आहेत त्यांना सांगू, तुम्हांला आम्ही चांगलीच अद्दल घडवू अशी धमकी देखिल दिली. आणि मग हे प्रकरण मिटविण्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे टप्प्या-टप्प्याने दिले तरी चालतील ट्रॅक्टर मालक कल्हापुरे यांनी "स्पष्ट" सांगितले की हे तिघेही गरीब घरची मुले आहेत त्यांची आर्थिक परिस्थती नाही असे सांगितल्यावर "त्यांनी दोन एकर जमीन विकून आम्हाला पैसे द्यावेत." अशी शक्कल आरोपींनी लढवली पैसे न दिल्यास आम्ही तुमच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत असा दम देखिल दिला.
म्हणून या सर्व प्रकरणाच्या कारणास्तव फिर्यादीच्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात खडांबे खुर्द चे रहिवासी असलेल्या ०१)दिनेश बाळासाहेब सगळगीळे, ०२)अनिता दिनेश सगळगीळे, ०३)प्रतिभा बाळासाहेब सगळगीळे ०४) चंद्रशेखर पवार (सर्वजण राहणार खडांबे खुर्द, ता. राहुरी) तिघांविरद्ध गुन्हा रजिस्टर नंबर -१३५१,/२०२१, भां.द.वि. ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करीत आहेत.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600

