shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्योती क्रांती "QR Code Service" सुविधेचे शानदार उदघाटन आणि लोकार्पण सोहळा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

  अ .नगर: (दि.६) :महाराष्ट्राच्या बॅंकिंग क्षेत्रात अग्रेसर तत्पर सेवा- सुविधा देणाऱ्या ज्योती क्रांती कॉ-ऑप क्रेडिट सोसा.लि.च्या वतीने दि.४ ऑगस्ट रोजी "QR code sarvice" चे शानदार उदघाटन अहमदनगर येथील भापकर सभागृह,मार्केट यार्ड येथे करण्यात आले.

 ज्योती क्रांतीचे चेअरमन मा.श्री. अजिनाथ हजारे,बी.व्ही.एम. इनव्हेस्टमेंट ॲण्ड सिक्युरिटी प्रा.लि.चे संचालक मा.श्री.अभिजित हजारे,व्हा.चेअरमन मा.श्री.दशरथ हजारे,ज्योती क्रांतीचे व्यवस्थापक मा.श्री.किरण वर्पे, मा.सौ.पुजाताई हजारे आणि सर्व वरिष्ट ज्योती क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते "QR Code Service" चे फित कापुन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्ज्वलन करुन उदघाटन आणि लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.
  

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती क्रांतीचे सहव्यवस्थापक श्री.डॅनियल सत्राळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुली अधिकारी श्री.अनिल काळे यांनी केले."ग्राहक खातेदारांना QR कोड सेवा ही आज काळाची गरज असुन ज्योती क्रांतीच्या मार्फत अनेक अत्याधुनिक सेवा- सुविधा देण्यासाठी ज्योती क्रांती तत्पर आहे".असे मत ज्योती क्रांतीचे चेअरमन श्री. हजारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.


   अवघ्या महाराष्ट्रातुन ज्योती क्रांतीच्या अठ्ठेचाळीस शाखांचे पदसिध्द अधिकारी, ज्योती क्रांतीचे माननीय संचालक मंडळ,खातेदार,सल्लागार मंडळाचे सदस्य,दै.ठेव प्रतिनिधी,बचत गट प्रेरक,संस्थेचे सोने परिक्षक,लेखा परिक्षक हितचिंतक या देखण्या सोहळ्यास उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्योती क्रांतीचे व्यवस्थापक मा.श्री.किरण वर्पे यांनी केले.कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार ज्योती क्रांतीचे जनसंपर्क अधिकारी श्री.रितेश साळुंके यांनी केले.

   कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्योती क्रांती कॉर्पोरेट ऑफीसचे श्री.राहुल वैराळ,श्री.अनिल बराते,श्री.सतीश वैराळ श्री.अमोल सुडके,श्री.विशाल औशीकर,श्री.संकेत गर्जे, सौ.देवशाला गायकवाड, उद्योगमित्र सौ.अमृता देशमुख, प्रतिक्षा शिंदे, मयुरा देसाई, मोना यादव, स्नेहल चौकटे, प्राजक्ता परभणे,सौ.आशा टाक यांनी विशेष परिश्रम घेतले. अहमदनगर व नागापुर शाखेचे शाखाधिकारी श्री.राहुल कांबळे आणि श्री.रोहन शेवाळे तसेच तालुका विकासक श्री.अनुप गांधी यांनी उपस्थितांची बैठक व्यवस्था केली.
close