प्रतिनिधी : मोहन शेगर सोनई
--सध्या लोकडाऊन थोड्याफार प्रमाणात शिथिल झाल्याने त्यात हाताला काम नाही,रोजगार नाही,पैसे नाही,त्यामुळे चोरट्यानी चक्क आता मोर्चा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाकडे वळवला आहे.त्यात एका शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने घेतलेल्या डाळिंबाच्या एक लाख किमतीची चोरट्यानी माल चोरून नेल्याची घटना घडली आहे.त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांना धसका बसला आहे.
या बाबत माहिती की,नेवासा तालुक्यातील मोरगव्हाण येथील पोलीस पाटील सर्जेराव रामभाऊ धंदक यांची मिरी-पाथर्डी रोडवर जमिनीचे क्षेत्र आहे, गट.न.१५० मध्ये १ एकर डाळींबाची बाग केली आहे,सध्या या क्षेत्रातून मार्केटमध्ये डाळिंब विक्रीसाठी दरोरोज माल जात होता,परंतु एक दिवस घरापासून २ की.मी.अंतरावर असलेल्या शेतात गेले असता,त्यांना आपल्या झाडावरील तोंडचा घास आलेल्या रसाळ डाळींबाची चोरी झाल्याचे दिसून आले, आजच्या घडीला डाळींबाला चागला भाव मिळत आहे. तसेच आजूबाजूला उसाचे पीक असून मध्यभागी हा डाळिंबाचा बाग असून शेजारी कोणतेही लोकवस्ती नसल्याने चोरट्यानी याचाच फायदा घेतला आहे. त्यात जवळपास एक लाखाची डाळिंब पिकाची चोरी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी जागते रहो, ही भूमिका घेतली आहे,
डाळींबाचा बागेतील आलेल्या रसाळ,लाल जडीत आलेल्या फळाची चोरी ही सर्व तयारीनिशी झाली असून,त्यात चारचाकी वाहन,सात-आठ चोरटे,दरम्यान टेहाळणी पासून ते शेता पर्यंत लोकेशन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कुठेतरी शहरी भागातील रस्त्यावर ह्या डाळींबाची विक्रीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा हा चोरीचा फंडा हाणून पाडण्यासाठी तरुण युवक सरसावले आहेत.


