प्रतिनिधी : रफिक शेख
चिचोंडी पाटील : (दि .१३) : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतची स्थापना १३ ऑगस्ट १९४१ रोजी झाली. त्याला आज ८० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचा ८० वा वर्धापन दिन सर्व माजी सरपंचांचा सन्मान करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सामूहिक केक कापून उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आजी-माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक जेष्ठ मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व दिवंगत माजी सरपंच स्व.बाजीराव गांधी, स्व.नारायण जगताप, स्व.खंडेराव ठोंबरे, स्व.मणिकचंद्र कांकरिया, स्व.रामकीसन खडके, स्व. यशवंत पवार, स्व.खंडू खराडे, स्व.रघुनाथ हजारे, स्व.आबासाहेब खडके याना श्रद्धांजली वाहून त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच शंकर पवार, पांडुरंग कोकाटे, बाजीराव हजारे, राजाराम हजारे, मच्छिंद्र खडके, दीपक चौधरी, अमोल कोकाटे, सौ.अर्चना चौधरी, सौ.अंजना पवार यांचा सत्कार करू त्यांनी गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नागरिक श्रीरंग कोकाटे, ययाती फिसके, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, कल्याण ठोंबरे, मजा सरपंच अमोल कोकाटे, शंकर पवार, चेअरमन राजेंद्र कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक प्रकाश ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यमान सरपंच मनोज कोकाटे यांनी केले.

