shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन मोहिमेचे कार्य कौतुकास्पद..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी :

पृथ्वीचे आरोग्य रोखण्यामध्ये वने अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. याच आनुशंगाने ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात येत आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी तीर्थक्षेत्र रामदरा, केसकर वस्ती काळभैरवनाथ मंदिर परीसर येथील ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून लावलेल्या वृक्षांना ठिबक सिंचन करण्यात आले. यावेळी ग्रीन फाऊंडेशन लोणी काळभोर शाखा, विभा गिरिश ट्रस्ट,जनाई शिक्षण संस्था पुणे, भगवा प्रतिष्ठान उपस्थित होते. कोळपे वस्ती येथे करण्यात आल्याले वृक्षारोपण तेथेही ग्रीन फाऊंडेशन माध्यमातून पाणी व पाणीटाक्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 



तसेच गवळेश्र्वेर आंळदी म्हातोबा येथील परिसरात 5000 लिटर पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत तेथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे तेथील डोंगर परिसरात औषधी तसेच जंगली झाडे लावण्यात येणार आहेत तसेच ठिबक सिंचन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रीन फाऊंडेशन सदस्य किरण भोसले साहेब यांनी सांगितले. वने, माती, व जैवविविधता यासह सर्व नैसर्गिक हवा, पाणी संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे पिण्यांसाठी संवर्धन करणे, मानवनिर्मित कृती मुळे होणारे प्रदुषण व नासाडी रोखणे किंवा त्याला घालणे याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि मोठया प्रमाणात ग्रीन फाउंडेशन प्रयत्न करणार आहे, त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम ग्रीन फाउंडेशन राबवणार आहेत नागरीकांनी प्रत्येकाने किमान एक तरी  झाड लावावे. रोप लावण्याबरोबर ती कशी जगातील याचीही खबरदारी घेतली पाहिजे संगोपन केले पाहिजे असे प्रतिपादन अभिषेक शेंडगे यांनी केले.

close