shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुका भाजप किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी बाबासाहेब उगले यांची निवड..!!

शिर्डी प्रतिनिधी : राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाची कार्यकारणी नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले प्रसंगी राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाच्या उपअध्यक्षपदी न.पा.वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाबासाहेब यादवराव पा. उगले यांची निवड करण्यात आली. गेले २५ वर्षापासुन मा. नामदार माजी विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व युवकांचे आदर्श खासदार श्री सुजय दादा विखे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून विश्वास संपादन केलेले न.पा.वाडी चे मा.उपसरपंच श्री बाबासाहेब पा उगले यांची एकनिष्ठ म्हणून नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक पदावर काम करण्याची संधी दिली त्याच विश्वासाने आता राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाच्या उपअध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 





साहेबांनी दाखविलेल्या विश्वासाला तढा जावु देणार नाही असे  भाजपा किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष श्री बाबासाहेब पा उगले यांनी सांगितले. याअगोदर न.पा.वाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून पद भूषविले आहे. कृषीमित्र महाराष्ट्र राज्य,  विविध कार्यकारी सोसायटी मा.संचालक, विषेश कार्यकारी अधिकारी, सदस्य तंटामुक्ती समीती , अध्यक्ष कालभैरव फार्मर्स क्लब अश्या बऱ्याच पदावर त्यांनी कामं केले आहे . जन सेवेचा ध्यास घेतलेले आणि न.पा.वाडी गावासाठी कामे करीत आहेत. श्री बाबासाहेब पा उगले यांनी मा.विरोधी पक्षनेते ना. श्री  राधाकृष्ण विखे पाटील मा. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व खासदार श्री सुजय दादा विखे पाटील व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री सतिष कानवडे साहेब, राहाता तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब डांगे  यांनी माझी राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाच्या उपअध्यक्षपदी निवड केली म्हणून आभार मानले.

close