गरजू सभासदांनी लाभ घ्यावा- मुकुंद सिनगर
शिर्डी शहर प्रतिनिधी : वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेची अकोले. शाखेतील स्थानिक संचालक कमिटी सोबत झालेल्या सभेनंतर कर्जवितरण सुरू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. खऱ्या अर्थाने अकोले तालुक्यातील कोरोना काळात अनेक व्यावसायिकांचे भांडवलाअभावी आपले व्यवसाय ठप्प झाले असल्याने व्यवसायांवर टांगती तलवार उभी आहे, अशात प्रामाणिक आणि होतकरू सभासदांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय मा.संचालक मंडळाने घेतला असून यापुढे अकोले तालुक्यातील सामान्य जनतेला सावकाराचे दरवाजे ठोठावे लागणार नाहीत, अशी प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन मा.मुकुंद सिनगर यांनी दिली.
नुकतेच संस्थेच्या वतीने शाखेत अल्पमुदत विनातारण कर्ज, बचत गट कर्ज, वाहन तारण कर्ज व सोने तारण कर्ज सुरू करण्याच्या सूचना मा.सरव्यवस्थापक श्री.गणेश वाळुंज यांनी दिल्या व त्यानुसार पहिल्याच दिवशी 5 अल्पमुदत कर्ज व 6 सोने तारण कर्जाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात प्रातिनिधिक स्वरूपात संस्थेचे सभासद व कुशल व्यावसायिक अतुल वाकचौरे यांना संस्थेच्या अल्पमुदत कर्जाचा धनादेश संस्थेचे संचालक श्री.सुनिल गिते यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी सुनील गिते यांनी अधिक सांगितले की येत्या काळात अकोले तालुक्यातील सामान्य जनतेच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्था भक्कमपणे पाठीशी उभी राहणार असून जास्तीत जास्त व्यावसायिकांनी संस्थेचे सभासद होण्यासाठी आवाहन केले आहे. सतत ऑडिट वर्ग अ" असणारी वसंतदादा मल्टिस्टेट स्वभांडवलावर आधारित संस्था आपल्या अकोले शाखेसह संपूर्णतः संघनिकृत असून सुशिक्षित व तत्पर सेवा देणारा कर्मचारी वर्ग आहे.
संस्थेची स्वतःची Rtgs व Neft प्रणाली असून अद्यावत मोबाईल बँकिंग सेवेच्या माध्यमातून आपले सभासद घरबसल्या बँकिंग सेवेचा आनंद घेऊ शकतात. कोअर बँकिंग च्या माध्यमातून लवकरच अकोले सारख्या दुर्गम भागातील आदिवासी व शेतकरी सभासदांना सर्वोत्तम सेवा देऊन आर्थिक साक्षर करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संचालक मा.सतिश दादा भांगरे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री.गणेश धुमाळ यांच्यासह स्थानिक संचालक मा.श्यामराव वाळुंज, मा.शैलेश देशमुख, मा.दत्ता नवले, मा.अतुल लोहाटे व मा.मिलिंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अकोले शाखेतील सह व्यवस्थापक श्री.मंगेश रनछोड काम पाहत असून अधिकाधिक विनम्र व तत्पर सेवा देत आहेत.



