shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडांबे खुर्द, येथील जेसीबी व्यावसायीक भगवान कल्हापुरे यांना आरोपी सगळगीळे ‍याने धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल.!!!

राहुरी : तालुका प्रतिनिधी- राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द गावामधील जेसीबी व्यावसायीक भगवान गोवर्धन  कल्हापुरे यांना काल दिनांक-०६ ऑगष्ट रोजी आरोपी दिनेश बाळासाहेब सगळगीळे (वय-३१) राहणार खडांबे खुर्द ता. राहुरी याने आपल्या स्वतःचा  फोन (७६६६७६१४३९) या नंबर वरून फिर्यादी कल्हापुरे यांना काल ०५ वाजता धमकी दिली आहे.
      

याबाबत सविस्तर माहिती आशी कि, दिनांक ०५/०८/२०२१ रोजी खडांबे येथील जेसीबी व्यावसायीक भगवान गोवर्धन  कल्हापुरे यांच्या कडे कामाला असलेले कामगार श्री. रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे, विनायक गर्जे (खडांबे ) बाप्पू रोहिदास ससाणे (गुंजाळे) यांनी दिनेश सगळगीळे याच्या पत्नीच्या अनैतिक संबधा बाबत चर्चा केल्या बाबत च्या कारणांमुळे आरोपी दिनेश सगळगीळे याने वरील तिघा जणांना रु.चाळीस लाख रुपये ची खंडणी मागितली होती. जर पैसे नाही दिले तर आम्ही तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुम्हांला जेलमध्ये पाठवू, तसेच आरपीआय चे भरपूर कार्यकर्ते आमच्या ओळखीचे आहेत अशी  धमकी दिल्यामुळे श्री.रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात  ६५३/२०२१ हा खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
       
वरील प्रमाणे कालचा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यामागे मुख्य्यसूत्रधार तु स्वतः आहेस म्हणून तु मनापासून निश्चित केल्यास दोन तासांत हे प्रकरण मिटवू शकतो. म्हणून तू आणि तुझ्या कामगारांनी मिळून दाखल केलेला गुन्हा मागे घे; जर तु सदरचा गुन्हा मागे घेतला नाही  तर मी माझी पत्नी अनिता हिला तुझ्या किंवा तुझ्या कामगारांच्या (तीन पैकी एकाच्या) घरासमोर घेऊन येऊन तिला मी स्वतः पेटवून देईल आणि याला जवाबदार तू स्वतः आणि तुझे कामगार असतील अशी धमकी फोन करून दिली. 
      
अश्या प्रकारची धमकी आरोपी दिनेश सगळगीळे याने जेसीबी व्यावसायीक श्री. भगवान गोवर्धन  कल्हापुरे यांना दिल्याने आरोपी दिनेश बाळासाहेब सगळगीळे (वय-३३) राहणार खडांबे खुर्द ता. राहुरी दिनांक ०६ /०८/२०२१ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर-१३८७/२०२१ भां.द.वि. कलम ५०७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड    कॉन्स्टेबल टेमकर हे करीत आहेत.                     

Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600
close