shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजलगाव मंतदार संघाचे नेतृत्व रमेश आडसकर यांनी जलसमाधीचा इशारा देताच व पाच गावचे ग्रामस्थांचा एकजूटी मुळे बारा दिवासात अरणवाडी तलावातील सांडवा पूर्ववत..!!

अंदोलनक्रत्या शेतकरी वर्गात आनंद ...
                                                  

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
धारुर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलाववरील सांडवा फोडल्या प्रकरणी पाच गावचे ग्रामस्थ आक्रमक होताच व सांडवा बांधनी करण्या साठी ग्रामस्थांनी मोठे आंदोलन करून या घोटाळे कडे प्रशासनाचे लक्ष वेधून प्रशासनाला जागे करून सांडवा पुर्वी प्रमाणे बांधनी केली. 

यामध्ये भाजपा नेते रमेश आडसकर यांनी 2 ऑगस्टच्या रस्ता रोको आंदोलना मध्ये शेतकऱ्यां सोबत जलसमाधी चा इशारा प्रशासनाला दिल्या नंतर प्रशासन  जागे झाले व सात आॕगस्ट रोजी सांडव्याची पाडलेल्या भागाची बांधनी केली  व ग्रामस्थच्या मागणीला यश आले.                           

या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तलावा जवळील पचशे मिटर राष्ट्रीय महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे करून घ्यावे अशी  मागणी अंदोलनक्रत्या  मधून होत आहे..

धारुर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा नियमबाह्य फोडल्या वर हा मुद्दा थेट राज्य शासना पर्यंत जाऊन प्रशासन जागे झाले व ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसत आहे .निकृष्ट झालेले घाटातील रस्त्याचे काम झाकण्या साठी तलावाचा सांडवा फोडण्यात आला व लाखो लिटर पाणी वाया गेले हे सोडलेले पाणी पाहून ग्रामस्थ आक्रमक होऊन संबंधित अधिकारी व गूत्तेदराच्या विरोधात आंदोलन केले. 

प्रशासनाचे लक्ष वेधून प्रशासनाला भाग पाडले। सांडवा चे पुर्वी प्रमाणे 7 आॕगस्ट रोजी सांडव्याची बांधनी करण्यात  आली असून ग्रामस्थां चे आंदोलन यशस्वी झाले . यासाठी माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांनी रस्ता रोकोच्या वेळी  तलावात जलसमाधी शेतकऱ्यांसह घेणार  असल्याचा इशारा दिला होता तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील शिनगारे ,भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादिक इनामदार ,शिवसेनेचे बाळासाहेब कुरुंद, जलदुत विजय शिनगारे, आय काँग्रेसचे सिद्धेश्वर रंधवे, प्रभाकर चव्हाण, राष्ट्रवादीचे सुरेश फावडे, शेतकरी कामगार संघटनेचे बजरग  माने, किसान आघाडीचे मधूकर चव्हान, संभाजी ब्रिग्रेडचे सचिन अंडील, पत्रकार, वंचित बहुजन आघाडी या संघटनेने ही रास्ता रोको करून सांडवा पुनर्बांधणी व रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यासाठी आंदोलन केले होते तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते ,सामाजिक संघटना व अरणवाडी, चोरंबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी आदी गावाचे ग्रामस्थांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले होते. 

सांडवा पुनर्बांधणी झाली असली तरी यामध्ये दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई व राष्ट्रीय महामार्गाचे पाचशै मिटर चे रस्ता उंचीकरण मजबूतीकरण व संरक्षण भिंती चे काम संथ गतीने ❓का. या  कामाची चौकशी करून रस्ता हा चांगल्या प्रतीचा करावा असे ग्रामस्थ मागणी करत आहे... 

धारुर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने हे करण्यात आले, ही बाब माहिती होताच रास्तारोको ठिकाणी अधिकाऱ्याला धारेवर धरून काम करण्यास भाग पाडले व काम न केल्यास 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेऊ असा इशारा देताच अवघ्या पाच दिवसांमध्येच  काम पूर्णत्वाला नेले .पण याकडे लोकप्रतिनिधी ने लक्ष देण्याची गरज होती पण त्यांचा सहभाग दिसलाच नाही हे दुर्दैवी म्हणावे लागेल.

 रमेशराव आडसकर भाजपा नेते
close