प्रतिनिधी मोहन शेगर
सोनई-- नेवासा तालुक्यातील बेल्हेकर वाडी येथील व आदर्श विद्या मंदिर मधील शिक्षक प्रा.चांगदेव दरंदले यांचे चिरंजीव रोहन चांगदेव दरंदले यांनी बारावी सायन्स परीक्षेत ६०० गुणांपैकी ५६९ गुण मिळवून ९५% टक्के मार्क मिळवले,त्यामुळे गावची व विद्यालयाची मान उंचावली आहे.तो शनीश्वर विद्या मंदिर येथे शिक्षण घेत होता.
या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, सरपंच, पदाधिकारी,व ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, आई,वडिल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

