प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई रविवार व्यापारी असोसिएशनची बैठक सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे यांनी बैठक घेतली जे कुणी चार नंतर दुकाने सुरु ठेवतील यांच्यावर दंडात्मक कारवाई इशारा दिला आहे मात्र जे व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते त्यांचे दुकाने किती वाजता बंद होतात व यांना कुणाचे आशिर्वाद आहेत याची करपे यांनी चौकशी करावी अशी मागणी सोनईचे माजी उपसरपंच संदिप कुसळकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की व्यापारी पेठैतील व शिवाजी रोड वरील दुकाने मात्र चार वाजून गेले तरी सुद्धा सुरू असतात दरम्यान काही वेळाने शटर बंद करून छोट्या दरवाज्याने आपली दुकानदारी करतात मात्र छोटे छोटे व्यवसाईक वभाजी पाला विक्रेते यांना मात्र चार वाजून गेले नंतर मात्र यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते एकतर करोना महामारी मुळे छोट्या व्यावसायिकांची मोडी पंचायत झाली आसताना प्रशासनाने नियम हे छोट्या व्यवसाईकानाच लावले जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण पोलीस कर्मचारी हे मोठ्या व्यापारी यांचे फिरकत सुद्धा नाहीत या उलटं छोट्या व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दंड केला जातो छोट्या आणि मोठ्या व्यापारी याना वेगळा नियम आहे काअसा प्रश पडतो शनिवार रविवार मोठ्या व्यापारी यांचे दुकाने छोट्या दरवाज्याने सुरुच आसतात मात्र पोलिस प्रशासन याचावर कुठलीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे नियम सर्वांना सारखैच असले पाहिजे मात्र एकाला वेगळा न्याय आणि दुस-याला वेगळा न्याय अशी परिस्थिती सोनईत सुरू आहे येथील हाँटेल व बार शटर बंद करून सुरू असतात सोनई बाहेरील हाटेल मात्र राजेरोस पणे सुरू असतात देशी दारू विक्रीतै हे शनिवारी व रविवारी दुकान बंद ठेउन बाजूलाच पिशवीत बाटल्या भरून विक्री करुन तळीरामाची भुक भागवतात यामुळे लाकडाउन असले तरी सर्व सुघा सर्व काही अलबेल असेच म्हणावे लागेल पोलीस मात्र चहा हाँटेल वाले टपरीधारक भाजीपाला विक्रेते यांचा वरच कारवाई करताना दिसतात व्यापारी पेठेतील दुकानावर केल्याचे दिसत नाही असे कुसळर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात केला आहे.

