shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक पदी पळसदेवचे सूरज वसंत काळे यांची निवड.

शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक पदी पळसदेवचे सूरज वसंत काळे यांची निवड.
भविष्यात येणारी प्रत्येक निवडणूक ताकतीने लढवणार - विशाल बोंद्रे.

इंदापूर प्रतिनिधी:(७ ऑगस्ट २०२१) शिवसेनेने पहिल्यांदाच सहकार सेने मध्ये मजबुतीने पाऊल टाकले असून भविष्यात येणारी प्रत्येक निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे आणि उपतालुका प्रमुख अप्पासाहेब डोंगरे यांनी केले.

  शिवसेना भवन मुंबई येथे खेळी मेळीच्या वातावरणात पुणे जिल्हा स्तरीय कही तालुक्यातील पदाधिकरी यांच्या नेमणुका(दि.७ ऑगस्ट) रोजी शिवसहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पताई सरपोतदार, उपनेते आणि विभागीय समन्वयक मिर्लेकर , पश्चिम महाराष्ट्र प्रमुख खोपडे , जिल्हा संघटक रमेश जाधव, लक्ष्मीकांत वडले माझी आमदार जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे, जिल्हा प्रमुख महेश पासलकर, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे हजर होते.

सत्ताधारी पक्ष्याचे सहकारातील तालुका स्तरीय प्रमुख पद पहिल्यांदाच पळसदेव गावात दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विविध संघटनेत कामाचा अनुभव असल्याने सहकरामध्ये चांगल्या प्रकारे पक्ष्याचे व सहकारसेनेचे काम होण्यास मदत होईल असे मत विशाल बोंद्रे यांनी व्यक्त केले.
close