राहुरी : तालुका प्रतनिधी (दिपक हरिश्चंद्रे). राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पायउतार होईल. अशा वल्गना केल्या जातात. परंतू, उर्वरित साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून, पुढील पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार सत्तेवर राहील. असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ठणकावून सांगितले.राहुरी नगरपालिका क्षेत्रात २० कोटी रुपये खर्चाच्या सुधारीत पिण्याच्या पाण्याची योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. या आधीच्या लोकप्रतिनिधींनी केवळ भुलभुलैय्या करून जनतेची फसवणूक केली असल्याची टीका नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.
जोगेश्वरी आखाडा येथे आज शनिवार ता. ०७ रोजी अंदाजे ३५ लाख रुपये खर्चाच्या स्मशानभुमी लोकार्पण अंतर्गत रस्ते, सौरउर्जेवरील दिवाबत्ती विकास कामांचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीच्या दौऱ्यावर आले असताना राहुरी पालिकेच्या नवीन आणि सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मंजुरीचे पत्र दिल्याचे भासविले होते, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या नव्हत्या. मी आमदार झाल्यानंतर सखोल चौकशी करत पाठपुरावा केला व येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करत योजना मार्गी लावली. लवकरच या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे.
मागील नगरपालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची व जाहीरनाम्यातील कामांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केला. त्यातील बहुतांश कामे मार्गी लावली. राहुरी नगरपलिका हद्दीतील अनेक रोहित्रं भरमुक्त केले, जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट , राहुरीच्या वैभवात भर घालणारा जॉगिंग ट्रॅक सुशोभिकरण करिता दोन कोटी रुपये लवकरच उपलब्ध होतील असेही यावेळी त्यांनी सांगितले तसेच राहुरीच्या सर्वांगीण विकास आणि कामाचा दर्जा याबाबत मी कटिबध्द आहे.
🌀राज्यातील सरकार लवकरच पडेल अशा वल्गना वेळोवेळी केल्या जात आहे. हे सरकार उर्वरित साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारच आहे असा विश्वास त्यांनी एक प्रकारे जनतेला दिला.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600

