प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनई रविवार दि (४ रोजी व्यापारी असोसिएशनची बैठक सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे यांनी घेतली. जे कुणी चार नंतर दुकाने सुरु ठेवतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र जे व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यांचे दुकाने किती वाजता बंद होतात व यांना कुणाचे आशिर्वाद आहेत याची करपे यांनी चौकशी करावी. अशी मागणी सोनईचे माजी उपसरपंच संदिप कुसळकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात केली आहे.
माजी उपसरपंच श्री संदिप कुसळकर
या बाबत सविस्तर माहिती अशी की व्यापारी पेठेतील व शिवाजी रोडवरील दुकाने मात्र चार वाजून गेले तरी सुद्धा सुरू असतात. दरम्यान काही वेळाने शटर बंद करून छोट्या दरवाज्याने आपली दुकानदारी राजरोसपणे करतात. मात्र छोटे छोटे व्यवसाईक व भाजी पाला विक्रेते यांना मात्र चार वाजून गेलेनंतर मात्र यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
एकतर करोना महामारी मुळे छोट्या व्यावसायिकांची मोठी पंचायत झाली असताना प्रशासनाचे नियम हे छोट्या व्यवसाईकांनाच लावले जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो, कारण पोलीस कर्मचारी हे मोठ्या व्यापारी यांचेकडे फिरकत सुद्धा नाहीत. या उलटं छोट्या व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दंड केला जातो. छोट्या आणि मोठ्या व्यापारी यांना वेगळा नियम आहे का..? असा प्रश्न पडतो.
शनिवार, रविवार मोठ्या व्यापारी यांचे दुकाने छोट्या दरवाज्याने सुरुच आसतात. मात्र पोलिस प्रशासन यांच्यावर कुठलीच कारवाई करत नसल्याने सोनईत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नियम सर्वांना सारखेच असले पाहिजे. मात्र एकाला वेगळा न्याय आणि दुस-याला वेगळा न्याय अशी परिस्थिती सोनईत सुरू आहे.
येथील हाँटेल व बार शटर बंद करून सुरू असतात, सोनई बाहेरील हाॅटेल मात्र राजरोस पणे सुरू असतात. देशी दारू विक्रेते हे शनिवारी व रविवारी दुकान बंद ठेउन बाजूलाच पिशवीत बाटल्या भरून विक्री करुन तळीरामाची भुक भागवतात. यामुळे लाॅकडाउन असले तरी सुध्दा सर्व काही अलबेल असेच म्हणावे लागेल.
पोलीस मात्र चहा हाॅटेल वाले, टपरीधारक, भाजीपाला विक्रेते यांच्यावरच कारवाई करताना दिसतात. व्यापारी पेठेतील दुकानावर कारवाई केल्याचे दिसत नाही. असे कुसळकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

