shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.गुरुदत्त सेवाभावी संस्था देहरेचा स्तूतीजन्य उपक्रम;३०० गरजूंना अन्नधान्य आणि किराणा किटचे वाटप...!!

देहरे / प्रतिनिधी

 देहरे : (दि . ७) : नगर तालुक्यातील देहरे गावात श्री गुरुदत्त सेवाभावी संस्था,देहरे या उपक्रमशील संस्थेच्या वतीने ३०० गरजूंना अन्नधान्य व किराणा किटचे सामाजिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले.

     जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे, त्यामुळे देशात आणि राज्यात अनेकांना कोरोनाचा फटका बसला आहे, अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 


          आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुर्वज्यांनी व संत महात्म्यांनी असे सांगितले आहे की, ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावरील कोणावरही नैसर्गिक संकटे,आपत्ती येऊन उपासमारीची वेळ येईल त्या त्या वेळी आपल्याकडील उपलब्ध असलेले जे जे देता येईल ते विनासायास द्यावे, म्हणजे पुढील काळात येणारे संकट आपोआप निवळत जाईल, त्यासाठी सर्वांनी असाच जे जे देणे शक्य होईल,ते ते दान- धर्म केल्यास आणि सर्वांनी मदतीचा हात पुढे केल्यास भविष्यात येणारे कितीही मोठे संकट असो ते हळुहळू नष्ट होत जाईल,आणि जर अशा संकट समयी जे जे दुसऱ्यांच्या संकटात मदतीला धावून न जाता नुसते धन- द्रव्याचा संचय करतील तर अशांच्या जीवनात भविष्यात संकटांचा महापूर येऊन त्या धन-द्रव्याचा ज्यांच्या साठी संचय केला आहे, त्यांना त्या धनाचा उपभोग घेता येईलच असे नाही..! 


         त्यामुळे अशा आपत्कालीन संकटात धनाचा संचय करण्यात धन्यता मानण्यापेक्षा संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात जरुर द्या नक्कीच भविष्यातील अडथळे दूर होतील, असे आपल्याला भारतीय भुमीतील महान संत-महात्म्यांची शिकवणच आहे,आणि संतांच्या या अनमोल शिकवणीचा आपण सर्वांनीच दिलदार पणा ठेवून स्विकार केला पाहिजे ...!

         ‌या उदात्त हेतूने देहरे ता.नगर येथील श्री‌. गुरुदत्त सेवाभावी संस्था,देहरे ही संस्था कार्य करत आहे,या संस्थेच्या माध्यमातून दिनांक १ऑगस्ट २०२१ रोजी ३०० गरजू नागरीकांना अन्नधान्य व किराणा सामान किटचे वाटप करण्यात आले.

        यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळत किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले,यावेळी दिवसभरात ३०० नागरीकांनी सामाजिक अंतर ठेऊन नियोजनबध्दरितीने किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे पदाधिकारी रमेश सखाराम जेठे (सर) सचिव सागर उत्तमराव धनवटे,हभप सखाराम महाराज जेठे, राजेश धनवटे, लक्ष्मण लष्करे, सीताबाई धनवटे, लताबाई धनवटे,राहिबाई जेठे व गरजू महिला उपस्थित होत्या.

श्री.गुरुदत्त सेवाभावी संस्थेच्या या स्तूतीजन्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे,खरेतर इतर सेवाभावी संस्था आणि दानशुरांनी अशा संकट समयी पुढे येणे गरजेचे आहे असे परिसरातील नागरीकांकडून बोलले जात आहे.
close