shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोथुल गावाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोथूलकरांचा उल्लेखनीय उपक्रम 

प्रतिनिधी : संजय वायकर

कोथूल : (दि .७) : श्रीगोंदा तालुक्यातील कोथूल ग्रामपंचायत , गावकरी आणि तरुणांनी कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी अनधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविली आहे .


कोल्हापूर व चिपळूण येथे झालेल्या पुरामुळे तेथील लोकांची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे . तेथे हवी असलेली मदत म्हणून फुल नाहीतर फुलाची पाकळी या विचारांनी कोथुल गाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत, गावातले गावकरी व सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आपल्या शेतामधील गहू,ज्वारी , बाजरी , तांदूळ , अन्नधान्याच्या आवश्यक गोष्टी तसेच या गावातील दुकानदारांनी देखील पाणी बॉटल बॉक्स अशी आवश्यक गोष्टी एकत्र करून कोल्हापूर व चिपळूण येथील गरजू लोकांपर्यंत बुधभूषण फाउंडेशन च्या मार्गदर्शनाने व WMO द्वारे पाठविले आहे .

सामाजिक बांधिलकीतून कोथूल गावाचा हा मदतीचा हात नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल.
close