shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी भाग रामपुरा येथील अमरधाम (स्मशानभूमी) चे लोकार्पण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते संपन्न..

हेमकांत गायकवाड
चोपडा प्रतिनिधी
चोपडा : चोपडा नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रामपुरा भागात पाच कोटी ६८ लाख रुपयांचे अमरधाम स्मशानभूमीचे लोकार्पण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेत व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभ हस्ते नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत केलेल्या कामांच्या लोकार्पण सोहळा सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला. 
रामपुरा भागातील अमरधाम स्मशानभूमीच्या ठिकाणी हजारो लोक एकाच वेळेस अंत्ययात्रेला येऊन एकाच ठिकाणी बसू शकतात व एकाच वेळी पाच प्रेतांची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा सुसज्ज अमरधाम स्मशानभूमी चे उद्घाटन व लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आला हि अत्यंत वैशिषट्यपूर्ण गोष्ट असल्याचे प्रा अरुणभाई गुजराथी म्हणाले . आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, मृत्यू हा अटळ आहे, तसेच गरिबी सारखा दुसरा गुरू कोणी नाही, गरिबी विसरून आत्मविश्वास वाढवा, अंधश्रद्धेने कधीच आत्मविश्रास वाढत नाही. चोपडा नगरपरिषद ही १५२ वर्षाची आहे. म्हातारी कधी झाली नाही, चिरतरुण पद्धतीने सदैव कार आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत स्वतः सहा वर्षे नगराध्यक्ष आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत स्वतः सहा वर्षे नगराध्यक्ष असल्याचे सांगत , जुन्या नगराध्यक्षांच्या नामोल्लेख केला. वॉर्ड मधील प्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक हा खूपच जिव्हाळ्याचा असतो असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आपल्या मनोगतात म्हणाले की अमरधाम स्मशानभूमीची संकल्पना अतिशय उत्तम असल्याचे म्हणाले. स्टेडियम सारखी बैठक व्यवस्था, सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तसेच सामजिक संदेश सुध्दा देण्यात आले आहेत. कोविडच्या दोन्ही लाटांचा मोठा तडाखा जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यास जास्त प्रमाणात बसला आहे. तसेच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.


सदर कार्यक्रम प्रसांगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रा अरुणभाई गुजराथी, अॅड संदीप पाटील, मनिषा जीवन चौधरी, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, रमेश शिंदे, सीमा अहिरे ( प्रांताधिकारी), सुमित शिंदे ( प्रांताधिकरी), अनिल गावीत (तहसिलदार), अविनाश गांगोडे (मुख्याधिकारी), डॉ विकास हरताळकर, चंद्रहासभाई गुजराथी, छंनु झेंडू पाटील, प्रा दिलीपराव सोनवणे, अॅड घनःश्याम निंबाजी पाटील, विरोधी गटनेता महेंद्र धनगर, आशिषभाई गुजराथी, हितेंद्र देशमुख, सुनिल जैन, राष्ट्रवादी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वच पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close