प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा : (दि . १७ ) : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्त मंदिर विकास नगर करमाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी करमाळा शहरातील अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला रक्तदान शिबिरात 94 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .
यावेळी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा करमाळा चे सन्माननीय सल्लागार श्री सचिदानंद साखरे ,श्री अब्दुल वहाब खान चाचा, श्री बिपिन दोशी ,श्री घनश्याम गांधी,श्री शाम भाऊ ढाळे तसेच सोलापूर सोशल फाउंडेशन चे सल्लागार श्री दीपक चव्हाण, श्री सचिन झिंजाडे व लोकमंगल पतसंस्थेचे व्यवस्थापक रमण परदेशी ,भाजप तालुका सरचिटणीस श्री अमरजीत साळुंके, शहर अध्यक्ष श्री जगदीश अग्रवाल ,श्री डॉक्टर श्रीराम परदेशी ,नगरसेवक महादेव आण्णा फंड ,भाजप महिला आघाडी चे सौ अश्विनी भालेराव, कुर्डूवाडी रक्तपेढी प्रमुख डॉ. कपिल हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी लोकमंगल पतसंस्था करमाळा शाखा व जेऊर शाखेचे स्टाफ श्री संदीप शिंदे, प्रसाद पलंगे ,दीपक रोकडे, सुरज कोकाटे ,अजय शिंदे व कमलेश ससाने त्याचबरोबर दर्शन कुलकर्णी ,संघर्ष दयाळ, महेश शहाणे, संतोष कांबळे ,मनोज कुलकर्णी, स्वप्नील चव्हाण, प्रतिक चव्हाण, विक्रांत येवले, गोपाल वाघमारे, पत्रकार आप्पा होनप, सचिन पांढरे ,सुशांत कुलकर्णी,अमोल कुऱ्हे, विकास माळी सर, सुनिल पवार यांनी परिश्रम घेतले.

